‘साराभाई वर्सेस साराभाई’ फेम अभिनेत्री वैभवी उपाध्याय हिचा हिमाचल प्रदेशमध्ये २२ मे रोजी रस्ते अपघातात मृत्यू झाला. वयाच्या ३२ व्या वर्षी अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतला. वैभवी तिच्या नियोजित पतीबरोबर हिमाचल फिरण्यासाठी गेली असता कार दरीत कोसळून तिचा जागीच मृत्यू झाला, परंतु तिचा प्रियकर जय गांधी याची प्रकृती आता बरी आहे. अपघातानंतर जय गांधीने संपूर्ण घटनेची माहिती दिली होती. यानंतर त्याने वैभवीबरोबर फोटो शेअर करीत भावुक पोस्ट केली आहे.
हेही वाचा : शुभमन-साराचा ब्रेकअप? इन्स्टाग्रावर केले अनफॉलो; गिलचा ‘तो’ जुना व्हिडीओ होतोय व्हायरल
जय गांधीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “रोजच्या प्रत्येक मिनिटाला मला तुझी आठवण येते. तू मला अशी सोडून जाऊ शकत नाहीस. मी सदैव तुझे रक्षण करेन, खूप लवकर हे जग सोडून गेलीस. RIP मेरी गुंडी… माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे.” वैभवीसाठी ही भावुक पोस्ट केल्यावर जय गांधीने काही वेळातच आपले इन्स्टाग्राम अकाऊंट प्रायव्हेट केले.
‘ई-टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत जय गांधी म्हणाले होते की, “लोकांना असे वाटते आहे की, आम्ही वेगात गाडी चालवली, परंतु असे काही नसून आम्ही खूप सुरक्षितरीत्या गाडी चालवत होतो. आम्ही ट्रक पुढे जाण्याची वाट पाहत होतो. हे सर्व सांगण्याच्या मन:स्थितीत मी सध्या नाही. कारण आम्ही सीटबेल्ट लावला नव्हता ही अत्यंत खोटी माहिती पसरवली जात आहे.”
हेही वाचा : आशिष विद्यार्थींच्या दुसऱ्या लग्नाबाबत पहिल्या पत्नीने दिली प्रतिक्रिया; म्हणाल्या “माझी फसवणूक…”
दरम्यान, वैभवी आणि जय यांचा साखरपुडा झाला होता आणि दोघेही येत्या डिसेंबरमध्ये लग्न करणार होते अशी माहिती समोर आली आहे. “वैभवी आणि जय १५ मे रोजी कुलूला फिरण्यासाठी निघाले होते. ते ज्या रस्त्याने प्रवास करीत होते तो रस्ता अतिशय लहान आहे, दोघेही ट्रक पुढे जाण्याची वाट पाहत होते, परंतु ट्रकने वळण घेताच कारला धडक दिली आणि कार दरीत कोसळली,” अशी माहिती अभिनेत्रीचा भाऊ अंकितने दिली आहे.