Vallari Viraj Breakfast & Diet Routine Revealed : वल्लरी विराज मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सध्या ती ‘झी मराठी’वरीलच ‘शुभ श्रावणी’ या मालिकेत मुख्य नायिकेची भूमिका साकारत आहे. वल्लरी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि यामार्फत तिच्या मालिकेच्या सेटवरच्या गमती जमती आणि दैनंदिन जीवनातील घडामोडी शेअर करत असते.

वल्लरीने अशातच सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. याध्ये तिने एक फोटो पोस्ट केलाय ज्यामध्ये अभिनेत्रीच्या आहारात काय असतं ते पाहायला मिळत आहे. वल्लरी सकाळी नाश्त्याला काय खाते याचा अंदाजा या फोटोमधून येतो. तिने शेअर केलेल्या या फोटोमध्ये ओट्स, उकडलेली अंडी ते थेपला असे वेगवेगळे पदार्थ दिसत आहेत. वल्लरी नाश्त्याला काय खाते याबद्दल जाणून घेऊयात…

वल्लरी विराज ब्रेकफस्टमध्ये काय खाते?

वल्लरी विराज एका मुलाखतींमधूनसुद्धा ती आरोग्याची काळजी घेते आणि त्यामुळे डाएट फॉलो करत असल्याने ती खाण्यावर नियंत्रण ठेवते पण, ती खवय्ये असल्याने तिला हे करणं कधी कधी कठीण जातं. असं सांगितलं होतं. तर तिला मासे विशेष आवडात असंही म्हटलं होतं. अशातच आता वल्लरीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटमध्ये उकडलेली अंडी, दही, आमरस, दह, थेपला, ओट्स, कॉफी असे वेगवेगळे पदार्थ पाहायला मिळत आहेत.

वल्लरी विराजची पोस्ट

संध्याकाळी ७ नंतर काहीच खात नाही वल्लरी

याचाच अर्थ वल्लरीचा नाश्त्याला घरगुती पदार्थांकडे कल असल्याचं दिसतं. वल्लरीने काही दिवसांपूर्वी राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत तिच्या आहाराबद्दल सांगितलेलं.वल्लरी म्हणालेली, “माझी आई रोज मला सेटवर डब्बा पाठवते. त्यात फळ, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण आणि मध्ये भुक लागली तर काहीतरी खाण्यासाठी असावं अशाही गोष्टी असतात. मला दही रोज लागतंच. त्याशिवाय मी जेवण करू शकत नाही आणि संध्याकाळचं जेवणसुद्धा आई देते कारण – मी संध्याकाळी ७ वाजताच डिनर करते.”

दरम्यान, वल्लरीने पुढे तिला स्वयंपाकही करता येतो असंही म्हटलं आहे. अभिनेत्री याबद्दल म्हणाली, “मी चिकन बनवते किंवा मांसाहारासंबंधीत काही बनवते तेव्हा आई कौतुक करते. मी थालीपटही करते. मला मसाले भात चांगला जमतो.”