Vanita Kharat New Tattoo : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून घराघरात पोहोचलेल्या वनिता खरातने आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून वनिता या कार्यक्रमातून प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचं काम करत आहे. एवढंच नव्हे तर वनिता आता मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही सक्रिय झाली आहे. हिंदी चित्रपटांसह जाहिरातीमध्ये ती पाहायला मिळत आहे. अशातच तिने एक नवा टॅटू काढला आहे. याचा व्हिडीओ तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे.

अभिनेत्री वनिता खरात ( Vanita Kharat ) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. फोटो, व्हिडीओ शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात असते. तसंच ती बऱ्याचदा चालू घडामोडींवर देखील भाष्य करत असते. नुकताच तिने नवा टॅटू काढला आहे. याआधी तिने डाव्या हातावर टॅटू काढला होता. त्यानंतर आता तिने पायावर टॅटू काढला आहे. याचा व्हिडीओ वनिताने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत टॅटू काढणाऱ्याचे आभार मानले आहेत.

abhishek gaonkar first kelvan
‘सारं काही तिच्यासाठी’ फेम अभिनेता लवकरच अडकणार लग्नबंधनात! पार पडलं पहिलं केळवण, होणारी बायको आहे तरी कोण?
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Tula Shikvin Changlach Dhada
Video: अधिपतीची जन्मदात्री चारुलता अक्षरासमोर, तर भुवनेश्वरी…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत नवं वळण
bigg boss marathi yogita Chavan husband saorabh chougule slams other bb contestants
Bigg Boss Marathi : “लायकी, भीक अशी घाणेरडी भाषा…”, योगिताच्या नवऱ्याची खरमरीत पोस्ट; म्हणाला…
akshaya deodhar started new saree business
Video : अक्षया देवधरने दाखवली साड्यांच्या व्यवसायाची पहिली झलक! पाठकबाईंनी राणादासह केली नव्या दालनाची पूजा
Yogita Chavan
“योगिता चव्हाण बिग बॉस आणि महाराष्ट्राला मूर्ख…”, पहिल्या पर्वातील मराठी अभिनेत्रीचं स्पष्ट मत
pandharinath kamble daughter grishma supports father and shared angry post on jahnavi killekar
बाबाच्या अपमानानंतर पंढरीनाथ कांबळेच्या लेकीची जान्हवीसाठी पोस्ट; म्हणाली, “त्यांच्या करिअरवर बोलण्याआधी…”
Suraj Chavan
“जर सूरज चव्हाणने बिग बॉसची ट्रॉफी जिंकली तर मी पुढचा सीझन बघणार नाही”, असं का म्हणाली अभिनेत्री?
Vanita Kharat

हेही वाचा – Bigg Boss Marathi : “लायकी, भीक अशी घाणेरडी भाषा…”, योगिताच्या नवऱ्याची खरमरीत पोस्ट; म्हणाला…

वनिताने ( Vanita Kharat ) उजव्या पायावर टॅटू काढला आहे. या टॅटूमध्ये ‘मुसाफिरा’ असं लिहिलं असून एक झाडं आणि सूर्य पाहायला मिळत आहे. तिच्या या सुंदर अशा टॅटूने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा – Devara Part – 1 : ज्युनियर एनटीआर-जान्हवी कपूरचं रोमँटिक गाणं संगीतकाराने केलंय कॉपी? नेटकरी ट्रोल करत म्हणाले, “काही वर्षांपूर्वी…”

वनिताचे आगामी चित्रपट कोणते? जाणून घ्या…

दरम्यान, वनिता खरातच्या ( Vanita Kharat ) कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिने यापूर्वी बऱ्याच मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. गेल्या वर्षी ती ‘एकदा येऊन तर बघा’ चित्रपटात झळकली होती. यंदा वनिता ‘येरे येरे पैसा ३’, ‘गुलकंद’ या चित्रपटांमध्ये पाहायला मिळणार आहे. संजय जाधव दिग्दर्शित ‘येरे येरे पैसा ३’ चित्रपट १ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात वनिता व्यतिरिक्त संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, आनंद इंगळे झळकणार आहे. तसंच सचिन गोस्वामी दिग्दर्शित ‘गुलकंद’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अजून जाहीर झालेली नाही. या चित्रपटात वनिता खरातसह प्रसाद ओक, सई ताम्हणकर, समीर चौघुले, ईशा डे असे तगडे कलाकार पाहायला मिळणार आहेत.