Vanita Kharat Kokan trip Video: वनिता खरात मुळची कोकणची आहे. नुकतीच ती कोकणात गेली होती. तेथील व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर आहे. या व्हिडीओमध्ये तिने काय मजा केली हे पाहायला मिळत आहे.

वनिता खरात व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

वनिता खरातने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सुरुवातीला पाहायला मिळते की ती पोहोण्यासाठी विहिरीत उडी मारते. त्यानंतर ती पोहण्याचा आनंद घेताना दिसत आहेत. त्यानंतर ती दुचाकीवरुन प्रवास करताना दिसत आहे. गणपतीची आरती करताना दिसते. तसेच केळीच्या पानावरील जेवणाचाही आनंद घेताना दिसते. उकडीचे मोदकही या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतात. तिच्या आजूबाजूच्या लोकांचीही झलक दिसते.

व्हिडीओमध्ये पुढे समुद्र, समुद्राच्या लाटाही दिसतात. नारळाची झाडे, चुलीवरचं जेवण अशा अनेक गोष्टी पाहायला मिळतात. व्हिडीओमध्ये ती डान्सही करत असल्याचे पाहायला मिळते. थोडक्यात काय तर वनिताने शेअर केलेल्या व्हिडीओमधून कोकणातील तिच्या गावची छोटीशी झलक पाहायला मिळते. या व्हिडीओमधून कोकणातील निसर्ग लक्ष वेधून घेत आहे.

हा व्हिडीओ शेअर करताना वनिताने, “जीवाचा कोकण करून इलाव”, असे लिहिले आहे. तसेच, कोकण, आपली माणसं, प्रेम, जिव्हाळा असे हॅशटॅगही दिले आहेत.

वनिताच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. अभिनेत्री नम्रता संभेरावने हार्ट इमोजी शेअर करत प्रेम व्यक्त केले आहे. तर एकाने लिहिले, “हा स्वर्ग कुठे आहे”, दुसऱ्या एकाने कोकण असे लिहित हार्ट इमोजी शेअर केल्या. आणखी एकाने, “खूप खूप सुंदर देखावा मॅडम गावाची आठवण ती आठवणच असते”, असे लिहिले. एकाने कोकण हा पृथ्वीवरील स्वर्ग असल्याचे लिहिले. एकाने लिहिले, “सुंदर”, आणखी एकाने लिहिले, “खरं सुख”, दुसऱ्याने लिहिले, “मला कोकण खूप आवडतं”, एकाने लिहिलं, “सुंदर”, अशा अनेक कमेंट्स करत नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

दरम्यान, वनिता विविध व्हिडीओंमधून चाहत्यांच्या भेटीला येत असते