Vanita Kharat Weight Loss Journey: वनिता खरात सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही महिन्यांपासून ती वजन कमी करण्यासाठी प्रयत्न आहे. तिने वजन कमीही केले आहे. एका मुलाखतीत तिने २४ किलो वजन कमी केल्याचा खुलासा केला होता.
वनिता खरातच्या वजन कमी करण्याच्या प्रवासात व्यायामाचा मोठा वाटा आहे. ती विविध प्रकारचे व्यायाम करत असते. ती अगदी पारंपरिक पद्धतीचेही व्यायाम करत असते. त्यांचे व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करीत असते. आता वनिताने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
वनिता खरातच्या लाठीकाठीचा सराव पाहून नेटकरी थक्क
वनिताने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती लाठीकाठीचा सराव करत असल्याचे दिसत आहे. कधी एका हाताने, तर कधी दोन्ही हातांनी ती लाठीकाठी फिरवताना दिसत आहे. तिची एनर्जी थक्क करणारी आहे.
हा व्हिडीओ शेअर करताना वनिताने लिहिले, “हळूहळू या कलेवर प्रभु्त्व मिळवत आहे.” तसेच लाठीकाठी, इंडियन मार्शल आर्ट, तसेच देसी फिटनेस, असे हॅशटॅग दिले आहेत.
नेटकऱ्यांनी केलं कौतुक
वनिताच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले, “किती महिने लागले २४ किलो वजन कमी करण्यासाठी? कसं आणि काय केलं? हे जाणून घेण्याची आमची खूप इच्छा आहे. प्लीज, आमच्यासाठी एक ब्लॉग बनव.” दुसऱ्या एकाने लिहिले, “वनिता भारी करतेस गं. तुझा खूप मोठा चाहता आहे.” एकाने लिहिले, “वाह”, एकाने लिहिले, “वनि एक नंबर”, आणखी एकाने लिहिले, “ताई, जबरदस्त”, एकाने लिहिले, “एकदम एक्स्पर्ट”, एकाने लिहिले, “खतरनाक. मलासुद्धा काही टिप्स दे”, आणखी एकाने लिहिले, “प्लीज, डाएटचा चार्ट शेअर कर”, अशा अनेक कमेंट्स करीत नेटकऱ्यांनी वनितावर कौतुकाचा वर्षाव केला. तसेच, अनेकांनी इमोजी शेअर करीत प्रेम व्यक्त केले.



दरम्यान, वनिता तिचे वजन कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असल्याचे तिच्या व्हिडीओंमधून दिसते. तसेच, ती विविध प्रकारचा व्यायाम करताना दिसते. आता वनिता तिच्या या प्रवासाबद्दल सविस्तरपणे कधी सांगणार, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
