Bigg Boss Marathi Varsha Usgaonkar : 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाला नुकतीच सुरुवात झालेली आहे. खेळ सुरू झाल्यावर पहिल्या दिवसांपासून घरातील सगळ्या स्पर्धकांमध्ये वाद सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. हिंदी 'बिग बॉस' गाजवणारी निक्की तांबोळी अन् मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर या दोघींमध्ये टोकाचे वाद सुरू आहेत. या भांडणामध्ये निक्कीने स्वत:ची पातळी सोडून माझा अपमान केला असे आरोप वर्षा यांनी केले आहेत. यावर आता सर्व स्तरांतून प्रतिक्रिया येत आहेत. निक्कीच्या वागणुकीवर नेटकऱ्यांसह पुष्कर जोग, उत्कर्ष शिंदे या अभिनेत्यांनी टीका केली होती. आता वर्षा उसगांवकरांच्या पाठिशी आणखी एक अभिनेता खंबीरपणे उभा राहिला आहे. 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत त्याने वर्षा उसगांवकरांच्या मोठ्या लेकाची भूमिका साकारली होती. कपिल होनरावने अभिनेत्रीला धीर देतानाचे मालिकेतील सीन्स दरम्यानचे काही फोटो देखील या पोस्टसह शेअर केले आहे. हेही वाचा : Kalki 2898 AD बॉक्स ऑफिस गाजवल्यावर OTT वर होणार प्रदर्शित; कुठे पाहता येणार अमिताभ बच्चन, प्रभासचा सिनेमा? वर्षा उसगांवकरांसाठी मराठी अभिनेत्याची पोस्ट ( Varsha Usgaonkar ) कपिल लिहितो, "Be Strong माई…ते लोक हिच्याशी अत्यंत चुकीचं वागले. ज्यांनी तुला वाटेत झोपायला लावलं त्यांची वाट नक्की लावेल हा महाराष्ट्र…मला आशा आहे की रितेश भाऊ बरोबर क्लास घेतील. #truewinner #degnity" या पोस्टमध्ये अभिनेत्याने 'कलर्स मराठी' व वर्षा उसगांवकरांना टॅग केलं आहे. हेही वाचा : क्रांती रेडकरच्या आईने चार्जर पाठवण्यासाठी लढवली शक्कल, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “समीर वानखेडे यांच्या सासूबाई…” 'बिग बॉस मराठी'मध्ये यंदा १६ स्पर्धकांनी प्रवेश घेतला आहे. पहिल्याच आठवड्यात स्पर्धकांमध्ये दोन ग्रुप पडल्याचं पाहायला मिळालं. निक्की - वर्षा, निक्की - आर्या, निक्की - अंकिता, जान्हवी - आर्या, जान्हवी - योगिता या स्पर्धकांमध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळालं. वर्षा उसगांवकर ( Varsha Usgaonkar ) हेही वाचा : दुसऱ्या पतीवर विवाहबाह्य संबंधांचे आरोप करत ८ महिन्यात वेगळी झाली अभिनेत्री, आता तो गर्लफ्रेंडसह आला मुंबईत, फोटो व्हायरल दरम्यान, पहिल्या आठवड्यात घरातून बेघर होण्याच्या प्रक्रियेसाठी वर्षा उसगांवकर, योगिता चव्हाण, अंकिता वालावलकर, धनंजय पोवार, सूरज चव्हाण, पुरुषोत्तम पाटील हे स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत. आता यापैकी कोण घराचा निरोप घेणार हे येत्या वीकेंडला रितेश देशमुखच्या भाऊच्या धक्क्यावर स्पष्ट होणार आहे.