Veen Doghantali Hi Tutena upcoming twist: तेजश्री प्रधान ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. सध्या ती ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत काम करत आहे. तिच्यासह या मालिकेत सुबोध भावे प्रमुख भूमिकेत आहे.
‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत सतत काही ना काही ट्विस्ट पाहायला मिळतात. मालिकेत दाखविल्याप्रमाणे, स्वानंदी व समर यांना परिस्थितीमुळे लग्न करावे लागले. स्वानंदीचा भाऊ रोहन व समरची बहीण अधिरा एकमेकांच्या प्रेमात होते. त्यांच्या लग्नाआधी स्वानंदीचे लग्न व्हावे अशी रोहनची अट होती. परिस्थिती अशी निर्माण झाली की समर व स्वानंदीला एकमेकांशी लग्न करावे लागले.
लग्नानंतर त्यांच्यात अनेक गैरसमज निर्माण झाले. त्यांचा एकमेकांवर विश्वास नव्हता. मात्र, वेळ जसा पुढे गेले तसा त्यांच्यात नात्यात विश्वास निर्माण झाला. स्वानंदीने त्यांच्यातील नाते चांगले व्हावे, यासाठी प्रयत्न केले. त्यांच्यात मैत्रीचे उत्तम नाते तयार झाले. समर व स्वानंदी यांच्यात चांगले बॉण्डिंग होत असताना समरच्या मैत्रीणीची किमयाची मालिकेत एन्ट्री झाली होती. तिच्या एन्ट्रीनंतर स्वानंदीला ती समरच्या प्रेमात पडल्याची जाणीव झाली. आता या सगळ्यात मल्लिका व तिची मुले स्वानंदी व समर यांच्यात दुरावा यासाठी सतत प्रयत्न करतात. पण, स्वानंदी व समर यांच्यातील जवळीक वाढत असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
“मी आता तुमचं रक्षण…”
झी मराठी वाहिनीने वीण दोघांतली ही तुटेना या मालिकेतील प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, मुसळधार पाऊस पडत आहे. समर पावसाकडे बघत उभा राहिलेला असताना स्वानंदी तिथे छत्री घेऊन पोहोचते. तिला पाहून समर तिला विचारतो, “तुम्ही इथे कशा काय?” त्यावर स्वानंदी भूतकाळातील एका गोष्टीची आठवण करून देत म्हणते की तुम्ही मला याच छत्रीने वाचवलं होतं की नाही? तर मी आता तुमचं रक्षण करत आहे. त्यानंतर समर म्हणतो, “तुम्ही जर आला नसतात तर मी घरापर्यंत भिजत भिजत गेलो असतो.” दोघेही एकाच छत्रीतून घराकडे जात असताना वाऱ्याने समरच्या हातातील छत्री उडते. त्यानंतर समर “अहो, छत्री…”, असे म्हणत ओरडतो. त्यानंतर पावसात भिजत असलेली स्वानंदी म्हणते, “पहिला पाऊस आहे, छान पावसात भिजायचं आणि निसर्गाचे आभार मानायचे.” त्यानंतर स्वानंदी पावसात भिजण्याचा आनंद घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर, समर पावसापासून स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न करत आहे.
वीण दोघांतली ही तुटेना मालिकेचा प्रोमो शेअर करत झी मराठी वाहिनीने, “पहिल्या पावसात खुलणार अव्यक्त प्रेम”, अशी कॅप्शन दिली आहे.
आता हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले, “दोघांतील अव्यक्त प्रेम. हळूहळू व्यक्त होत जाऊदे. पण, समर रावांची गाडी प्लीज मॅडम आणि मैत्रिण वरून बायको वर येऊ दे. प्रेमात पडलेला, ते थोडं लक्षात येणारा, थोडं लपवत असणारा आणि थोडं नकळत व्यक्तही करणारा समर पहायची खूप उत्सुकता आहे”, एकाने लिहिले, “ते दोघे एकत्र किती क्यूट दिसत आहेत”, एकाने लिहिले, “समर समरसारखाच अनेक दिवसांनी वागत आहे”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.




दरम्यान, वीण दोघांतली ही तुटेना मालिकेत पुढे काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
