Veen Doghantali Hi Tutena upcoming twits: ‘वीण दोघांतली ही तुटेना मालिकेतील स्वानंदीला आई व्हायचे आहे. काही दिवसांपासून तिला ती प्रेग्नंट असल्याचे वाटत होते. मात्र, पुन्हा तिचं स्वप्न अपूर्ण राहिलं असून ती नाराज झाली आहे. झी मराठी वाहिनीच्या ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे.
“खूप रिकामं वाटतंय”
झी मराठी वाहिनीने, ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेतील प्रोमोमध्ये सणाचे वातावरण पाहायला मिळत आहे. घरात लायटिंग लावल्याचे दिसत आहे. स्वानंदी समरला ओवाळते. मात्र, त्यावेळीही तिच्या चेहऱ्यावर चिंता दिसत आहे. ओवाळताना ती मनातल्या मनात म्हणते, “कसं सांगू? मला काहीच समजत नाही. आतून खूप रिकामं वाटतंय. असं वाटतंय, आता पुढे काय? मी आईच झाले नाही तर?”
स्वानंदी मनातल्या मनात या गोष्टी बोलत असताना समर तिथे येतो. तो म्हणतो, “मला तुमच्या मनातली घालमेल कळतेय. आपण आई-बाबा नक्की होणार. यावर विश्वास ठेवा. फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्हाला मातृत्व हवंय की प्रसुती? तुमचा जो काही निर्णय असेल, त्यात मी कायम सोबत आहे”, असे म्हणत तो स्वानंदीकडे त्याचा हात पुढे करतो. स्वानंदी त्याच्या हातात हात देते.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “समरने नात्याच्या नाजूक क्षणांची वीण हळूवारपणे घट्ट करायचं ठरवलंय, जमलंय!”
वीण दोघांतली ही तुटेना मालिकेचा प्रोमोवर नेटकऱ्यांनी कमेंट्चा वर्षाव केला आहे. “समर आणि स्वानंदी हे सगळं खूप छान प्रकारे हाताळतील, याची खात्री आहे. पण त्याहून जास्त मातृत्व की प्रसूती? प्रश्न भावला. काय सुंदर विचार आहे. लेखकाचं आणि हे शब्द मांडणाऱ्या व्यक्तीचं खरंच कौतुक करावं तेवढं कमीच आहे”, “खूप महत्वाचा आणि संवेदनशील विषय उत्तमरित्या पुढे आणलाय”, “किती छान पद्धतीने हा विषय हाताळला जात आहे. खूप छान. अतिशय संवेदनशील विषय समोर आणला आहे. समर स्वानंदी ची शेवट पर्यंत साथ देईल”, अशा अनेक कमेंट्स करत नेटकऱ्यांनी वीण दोघांतली ही तुटेना मालिकेच्या प्रोमोवर कौतुकाचा वर्षाव होतोय.



दरम्यान, वीण दोघांतली ही तुटेना मालिकेत पुढे नेमकं काय घडणार हे पाहण्यासाठी नेटकरी उत्सुक आहेत.
