Veen Doghatli Hi Tutena fame Chingi and Anshuman Offscreen Bonding: ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत सतत काही ना काही ट्विस्ट येत असल्याचे पाहायला मिळत आहे. या मालिकेत सतत काही ना काही ट्विस्ट पाहायला मिळतात. स्वानंदी, समर यांच्यासह मालिकेतील अंशुमन, मल्लिका, अधिरा, रोहन, मंदाकिनी हे पात्रे प्रेक्षकांची मने लक्ष वेधून घेतात.
मालिकेत दाखविल्याप्रमाणे, मल्लिकाचा मुलगा अंशुमनचे लग्न होते. मात्र, त्याचदरम्यान चिंगी प्रेग्नेंट असल्याचे समजले. स्वानंदीसमोर चिंगीचे रिपोर्ट आले. ते बाळ अंशुमनचे असल्याचे चिंगीने तिला सांगितले.. त्यानंतर स्वानंदीने अंशुमनचे सत्य सर्वांसमोर आणत त्याचे लग्न मोडले. त्यानंतर मल्लिका, अंशुमन चिंगीला विविध प्रकारे त्रास देत असल्याचे पाहायला मिळत आहे.
चिंगी हे पात्र रोहिणी नाईकने साकारले आहे. तर अंशुमन हे पात्र हरिश थोरातने साकारले आहे. ऑनस्क्रीन त्यांच्यात भांडणे, वाद पाहायला मिळत असले तरी ऑफस्क्रीन मात्र त्यांच्यात चांगले बॉण्डिंग असल्याचे पाहायला मिळते.
रोहिणीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते दोघे Vachindamma या गाण्यावर डान्स करत असल्याचे पाहायला मिळत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला ते भांडत असल्याचे पाहायला मिळत आहे. गाणे सुरु झाल्यावर ते सुंदर डान्स करतात. शेवटी चिंगी हसताना दिसत आहे.
चिंगी व अंशुमनचं ऑफस्क्रीन बॉण्डिंग कसं आहे?
हा व्हिडीओ शेअर करताना रोहिणीने लिहिले, “असंख्य रिटेक्सनंतर रील तर तयार झाली, पण हसणं काही थांबलंच नाही.म्युझिक सुरू झालं की भांडणंही आपोआप संपतात.कधी कधी सगळ्यात सुंदर केमिस्ट्री ही प्लॅन केलेली नसते, ती त्या क्षणांमध्ये असते जेव्हा हसणं आवरतच नाही.”
पुढे तिने असेही लिहिले, “‘वीण दोघांतली ही तुटेना’मध्ये चिंगी व अंशुमनचे लग्न होईल का? तुम्हाला काय वाटतं?”
आता अभिनेत्रीच्या या व्हिडीओवर अनेक कमेंट्स आल्या आहेत. एकाने लिहिले, “आता असेच अंशुमनला मालिकेतही चांगले दाखवा”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “तुम्ही दोघांनी खूप छान डान्स केला”, एकाने लिहिले, “तुम्ही दोघे एकत्र किती गोड दिसत आहात. चिंगी व अंशुमन आता पटापट लग्न करून टाका”, आणखी एकाने लिहिले, “अंशुला मी किती शिव्या देते. पण, आता देणार नाही”, एकाने लिहिले, “इथे तुम्ही डान्स करत आहात. तिकडे माझी आजी तुम्हाला मालिकेत पाहून रडत आहे”, आणखी एकाने लिहिले, “स्वानंदी बघ ही चिंगी परत अंशुमनच्या जवळ गेली”, एकाने लिहिले, “अंशुमनला सांग तुझ्याशी चांगलं वागायला”, आणखी एकाने लिहिले, “चिंगी त्या अंशुमनबरोबर कशाला नाचतेस?”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.
दरम्यान, आता मालिकेत काय होणार, अंशुमन व चिंगीचे लग्न होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
