Raj more and Purniemaa Dey Dance on Ding Dang Ding Dole song: अभिनेता राज मोरे आणि अभिनेत्री पूर्णिमा डे ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकांद्वारे काम करीत आहेत. राजने रोहन ही भूमिका साकारली आहे; तर पूर्णिमाने अधिरा ही भूमिका ही साकारली आहे. ते दोघे पती-पत्नीच्या भूमिकांत दिसत आहेत. आता राज व पूर्णिमा हे त्यांच्या भूमिकेमुळे नाही, तर त्यांच्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आले आहेत.
‘वीण दोघांतली ही तुटेना’ फेम रोहन व अधिराचा २४ वर्षांपूर्वीच्या जुन्या गाण्यावर कमाल डान्स
राज मोरेने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये त्याच्याबरोबर पूर्णिमादेखील दिसत आहे. दोघांनीही काळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. त्यांनी एका जुन्या गाण्यावर सुंदर डान्स केला असल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
राज व पूर्णिमाने २००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या कुछ तो है या सिनेमातील डिंग डांग डिंग डोले या गाण्यावर डान्स केला आहे. त्यांच्या डान्स स्टेप्स, हावभाव सगळं काही लक्ष वेधून घेत आहे. त्याबरोबरच त्यांची मजा-मस्तीही पाहायला मिळत आहे. तसेच मधेच ते आवरतानाही दिसत आहेत. त्यामुळे त्यांचा हा डान्स व्हिडीओ व्हायरल होत असून, चाहत्यांना तो आवडला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना राजने लिहिले, “काही गाणी कधीच जुनी होत नाहीत, ती तुम्हाला डान्स करायला भाग पाडतात.”
राज व पूर्णिमाच्या या डान्स व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. मुग्धा गोडबोले यांनी लिहिले, “सुपर्ब”, वैष्णवी कल्याणकरने लिहिले, “वाह”, धनश्री काडगावकरने लिहिले, “खूप छान, खूप छान”, पूर्वा शिंदेने प्रेम व्यक्त करीत इमोजी शेअर केल्या. तसेच, राज व पूर्णिमाची सहकलाकार अपूर्वानेही त्यांचे कौतुक केले.
याबरोबरच, अनेक चाहत्यांनीही या दोन्ही कलाकारांचे कौतुक केले आहे. “तुम्ही दोघेही खूप सुंदर दिसत आहात”, “तुम्ही दोघे कमाल आहात”, “राज, तू इतका चांगला डान्स करतोस, हे आम्हाला माहीत नव्हतं”, “तुम्ही दोघे एकमेकांसाठी बनला आहात”, “खूपच छान”, अशा अनेकविध कमेंट्स पाहायला मिळत आहेत.
दरम्यान, राज व पूर्णिमाची ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. त्यांच्या जोडीला प्रेक्षकांना कायम प्रेम मिळत असल्याचे दिसते.
