Veen Doghatli Hi Tutena upcoming twist: सतत भांडणाऱ्या, एकमेकांना टोमणे मारणाऱ्या आणि सतत एकमेकांच्या चुका काढणाऱ्या दोन व्यक्तींमध्ये छान मैत्री झाली तर? आता अशीच मैत्री ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेतील समर व स्वानंदी यांच्यात झाली आहे.

‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत समर व स्वानंदी यांच्यात सुरुवातीला सतत गैरसमज होत असत, त्यामुळे त्यांच्यात भांडणे व्हायची. परिस्थिती अशी निर्माण झाली की त्यांना पुढे लग्न करावे लागले. लग्नानंतर हळूहळू एकमेकांच्या स्वभावाबद्दल माहिती होऊ लागली, वागण्या मागची कारणे एकमेकांच्या लक्षात येऊ लागली तशी त्यांच्यात हळूहळू मैत्री होऊ लागली. ही मैत्री आता घट्ट होताना दिसत आहे.

जेव्हा समर व आनंद या दोन घट्ट मित्रांमध्ये मल्लिकामुळे गैरसमज झाला. त्यावेळी त्यांच्यातील गैरसमज दूर करण्यासाठी स्वानंदीने प्रयत्न केले. सत्य सर्वांसमोर आणले.

Award Banner

समरदेखील स्वानंदीला आवडणाऱ्या छोट्या-मोठ्या गोष्टी करताना दिसतो. या सगळ्यात मल्लिका मात्र, समर व स्वानंदीला त्रास देण्यासाठी, त्यांच्यात गैरसमज निर्माण करण्यासाठी, स्वानंदीला घरातून बाहेर करण्यासाठी तिच्या दोन मुलांच्या मदतीने अनेक कारस्थाने करते. काही वेळा तिच्या प्रयत्नांना यश मिळते. तर, काही वेळा ती अपयशी ठरते. आता पुन्हा एकदा मल्लिका समरविरुद्ध कट करणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

मल्लिका समरविरुद्ध करणार ‘ते’ कारस्थान

झी मराठी वाहिनीने, सोशल मीडियावर ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, समर स्वानंदीला त्याच्या गोळ्यांचा बॉक्स दाखवतो. तो म्हणतो, “ही माझी लाईफलाईन आहे.” त्यावर स्वानंदी म्हणते, “थोडसं निरोगी आयुष्याकडे वळण्याचा प्रयत्न करून बघा.” समर व स्वानंदीचे बोलणे मल्लिका ऐकत असते.

प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, मल्लिका तिच्या मुलीला सांगते की, काहीही झालं तरी या गोळ्या सुरू राहिल्या पाहिजेत. समर खोलीत नसताना ती त्याच्या खोलीत जाते आणि त्याच्या औषधांचा बॉक्स लपवून घेऊन येते. तसेच, ती असेही म्हणते, “इतकी वर्षे मीच त्या गोळ्यांची सवय समरला लावली आहे.”

त्यानंतर मल्लिकाचा मुलगा अंशुमन एका माणसाला पैसे देतो. तो माणूस समरच्या खोलीत पेस्ट कंट्रोल करतो. जेव्हा समर बाथरुममधून बाहेर येतो, तेव्हा पेस्ट कंट्रोलच्या विषारी धुरामुळे त्याला गुदमरल्यासारखे होते. तो औषधे शोधतो, पण त्याला त्याचा औषधांचा बॉक्स सापडत नाहीत. त्यानंतर तो बेशुद्ध पडतो.

प्रोमोच्या शेवटी पाहायला मिळते की स्वानंदी खोलीचा दरवाजा उघडून आत येते. त्यानंतर तिच्या चेहऱ्यावर धक्का बसल्याचे भाव पाहायला मिळतात.

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “समरच्या जीवावर पुन्हा उठली मल्लिका”, अशी कॅप्शन दिली आहे. आता या मालिकेत पुढे काय घडणार, स्वानंदी समरला वाचवू शकणार का, मल्लिकाचे कारस्थान समोर येणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.