Veen Doghatli Hi Tutena: जेव्हापासून स्वानंदी आणि समर भेटले, तेव्हापासून त्यांच्यात कोणत्या ना कोणत्या कारणामुळे भांडणे होताना दिसली. समरचा भाऊ अंशुमनच्या कारस्थान, खोट्या वागणे यांमुळे त्यांच्यात गैरसमज होत राहिले.

वीण दोघांतली ही तुटेना या मालिकेतील स्वानंदी आणि समर यांच्यात सतत भांडणे, गैरसमज होताना दिसतात. असे असले तरी त्यांनी भावंडांसाठी एकमेकांशी लग्न केले. त्यांच्या लग्नानंतर समरची काकू मल्लिकाने मुलगा अंशुमनच्या मदतीने समर आणि स्वानंदी यांच्यात गैरसमज वाढतील यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी कधी मंदाकिनीला पैशांची लालूच दाखवली; तर अनेकदा समस्या निर्माण करून त्याला स्वानंदी जबाबदार असल्याचे सांगितले गेले.

मालिकेत दाखविल्याप्रमाणे अंशुमनने ऑफिसमधील एका मुलीला श्वेताला त्रास दिला होता. जेव्हा तिने हे समरपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिला धमकी देण्यात आली. जेव्हा स्वानंदीला याबद्दल समजले तेव्हा तिने श्वेताला मदत करण्याचा निर्णय घेतला. तिने तसा प्रयत्न केला, त्यावेळी तिला अपयश आले. तसेच समरचा स्वानंदीबद्दल आणखी गैरसमज निर्माण झाला. आता स्वानंदीने समरसमोर पुरावा सादर केल्याचे पाहायला मिळत आहे.

Award Banner

‘एवढा विकृत…”

झी मराठी वाहिनीने वीण दोघांतली ही तुटेना मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. प्रोमोच्या सुरुवातीला पाहायला मिळते की, राजवाडे कुटुंब एकत्र जमले आहे. स्वानंदी समरला म्हणते, “ज्याला तुम्ही आदर्श भाऊ मानता, त्याचा खरा चेहरा सर्वांसमोर येणं,खूप जास्त गरजेचं आहे. त्यानंतर ती एक व्हिडीओ दाखवते. तो व्हिडीओ पाहिल्यानंतर समरचा संताप अनावर होतो.

तो अंशुमनला म्हणतो, “तुझ्यावर विश्वास ठेवला रे. एवढा विकृत वागलास तू?”, त्यावर अंशुमन म्हणतो, “दादा तुला माहीत नाही. श्वेताच एक नंबरची युजलेस आणि चीप मुलगी आहे.” ते ऐकल्यानंतर समर अंशुमनच्या कानाखाली मारतो. तो त्याला म्हणतो, “इतकं खोटं वागण्याची आणि नालायकपणा करण्याची हिंमत तुझ्यात कुठून येते?”

प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, श्वेता तिथे आली आहे. आजी अंशुमनला तिची माफी मागायला सांगते. त्यानंतर खाली बसून, हात जोडून अंशुमन श्वेताची माफी मागत असल्याचे पाहायला मिळत आहे.

हा प्रोमो शेअर केल्यानंतर झी मराठी वाहिनीने, “अखेर अंशुमनचा खरा चेहरा समोर आणत श्वेताला न्याय मिळवून देणार”, अशी कॅप्शन दिली आहे.

नेटकरी म्हणाले…

आता हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. “वाह मस्त हेच बघण्यासाठी इतके दिवस वाट पाहायला लागली”, “स्वानंदी एकदम बेस्ट काम केलं”, “देव पावला रे”, “आता खरी मजा येणार”, “एका स्त्रीला न्याय मिळवून दिला, त्याबद्दल थँक्यू”, “एक नंबर, थँक्यू समर. मस्त कानाखाली वाजवली”, “आता मजा येणार”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

दरम्यान, आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.