Veen Doghatli Hi Tutena upcoming twist: ‘वीण दोघांतली तुटेना’ या मालिकेत सतत काही ना काही नवीन घडताना दिसते. स्वानंदी व समरच्या आयुष्यात चढ-उतार येतात. त्याच्यांत अनेकदा भांडणेही होतात.
मालिकेत दाखिवल्याप्रमाणे, समर राजवाडे हा मोठा उद्योगपती आहे. एका अपघतात त्याच्या आई- वडील-बहिण आणि काकांचा मृत्यू झाला. त्यानंतर तो त्याच्या आजी, काकू आणि चुलत भावंडांबरोबर राहिला. त्याने बिझनेसची जबाबदारी घेतली. इतकेच नाही तर घराचीही त्याने जबाबदारी घेतली.
कोणाला कधीही काहीही कमी पडू नये, त्यांना कोणतीही अडचण येऊ नये याची वेळोवेळी काळजी घेतली. त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला. नि:स्वार्थपणे प्रेम केले. त्याची आजी आणि त्याची चुलत बहीण अधिरादेखील समरला खूप जीव लावतात, त्याच्यावर प्रेम करतात. पण, काकू व त्याची दोन चुलत भावंडे मात्र समरच्या निस्वार्थ प्रेमाचा फायदा घेत असल्याचे दिसते.
समरच्या समोर चांगले असल्याचे नाटक करत त्याच्या पाठीमागे मात्र त्याच्याविरुद्ध मल्लिका काकू कारस्थान करते. त्यात तिची मोठी मुलगी आणि मुलगा अंशुमन तिला साथ देतो.
जेव्हापासून स्वानंदी आणि समरचे लग्न झाले आहे, तेव्हापासून मल्लिकाने त्यांच्याविरुद्ध कारस्थान केले आहे. त्यांच्यात व रोहन व अधिरा यांच्यात भांडणे व्हावी यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. काकूचे हे रुप स्वानंदीच्या लक्षात आले आहे.
‘वीण दोघांतली ही तुटेना’मध्ये ट्विस्ट
आता समोर आलेल्या प्रोमोमध्ये मल्लिका, समर आणि त्याचा मित्र आनंद यांच्या मैत्रीत फूट पाडण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. झी मराठी वाहिनीने वीण दोघांतली ही तुटेना मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे.
या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की मल्लिकाने आनंदला एका ठिकाणी बोलावले आहे. तो तिथे गेल्यानंतर मल्लिका त्याला एक ऑफर देते. ती म्हणते, “तू जर नसतास ना, तर आमच्या समरची कंपनी इतकी मोठी झाली नसती. मी तुला दहा लाख पगार देते, माझ्या कंपनीत जॉईन हो.” त्यावर आनंद नाही म्हणतो आणि तो तिथून निघून जातो.
प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, समरला आनंदच्या नावाने लिहिलेले एक पत्र मिळते. ज्यामध्ये लिहिलेले असते की, प्रिय समर मला माफ कर. मला आताच्या जॉबपेक्षा उत्तम संधी मिळाली आहे, म्हणून मी तुझ्या कंपनीतून बाहेर पडू इच्छितो. पुढे आनंदचे नाव लिहिलेले असते. तर दुसरीकडे काही लोक आनंदला किडनॅप करत असल्याचे दिसते.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “मल्लिकाचा नवा डाव समर आणि आनंदच्या मैत्रीत फूट पाडणार”, अशी कॅप्शन दिली आहे.
दरम्यान, आता मालिकेत नेमकं काय होणार, आनंदला किडनॅप केल्याचे सत्य समरला समजणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
