"मी नेहमी तुझ्याबरोबर..." वीणा जगताप आणि शिव ठाकरे पुन्हा येणार एकत्र, पोस्ट चर्चेत | Veena Jagtap support Shiv Thakare bigg boss hind actress Instagram post goes viral nrp 97 | Loksatta

“मी नेहमी तुझ्याबरोबर…” वीणा जगताप आणि शिव ठाकरे पुन्हा येणार एकत्र, पोस्ट चर्चेत

वीणाने हार्ट इमोजी शेअर करत चाहत्यांना ते एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत.

“मी नेहमी तुझ्याबरोबर…” वीणा जगताप आणि शिव ठाकरे पुन्हा येणार एकत्र, पोस्ट चर्चेत
वीणाची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे

छोट्या पडद्यावरील सर्वांत लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त रिअॅलिटी शो म्हणून बिग बॉसकडे पाहिलं जातं. ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणून वीणा जगताप हिच्याकडे पाहिले जाते. ती नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. नुकतंच वीणा जगतापने शिव ठाकरेसाठी एक पोस्ट शेअर केली आहे.

बिग बॉस हा रिअॅलिटी शो कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. शिव ठाकरेने बिग बॉस मराठीचे दुसरे पर्व जिंकले होते. या पर्वानंतर आता शिव हा बिग बॉस १६ मध्ये सहभागी झाला आहे. या कार्यक्रमाद्वारे त्याने हिंदी रसिकांची मनं जिंकली आहेत. नुकत्याच झालेल्या एका एपिसोडमध्ये शिव ठाकरेला अश्रू अनावर झाले आणि तो रडताना दिसला. नेहमीच खंबीर राहणाऱ्या शिवला रडताना पाहून सगळेच हैराण झाले आहेत. त्यानंतर आता वीणाने शिव ठाकरेला पाठिंबा दिला आहे.
आणखी वाचा : “पहिलं आणि शेवटचं…” शिव ठाकरेबद्दलचा प्रश्न विचारल्यानंतर वीणा जगताप संतापली

वीणा ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय आहे. नुकतंच वीणाने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. यात तिने शिवचा बिग बॉसच्या घरातील रडताना व्हिडीओ पोस्ट केला आहे. या पोस्टबरोबर तिने शिवसाठी खास कॅप्शनही दिले आहे. “वाघ आहेस तू…. रडू नकोस अजिबात… मी आहे सोबत नेहमी” असे तिने या पोस्टला कॅप्शन दिले आहे. याबरोबर तिने रेड हार्ट इमोजीही शेअर केले आहे.

वीणाच्या या पोस्टमुळे चर्चांना उधाण आले आहे. ते दोघेही लवकरच एकत्र येणार असल्याचेही बोललं जात आहे. विशेष म्हणजे वीणाने तिच्या या पोस्टमध्ये हार्ट इमोजी शेअर करत चाहत्यांना संकेत दिल्याचेही बोललं जात आहे. मात्र अद्याप याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

आणखी वाचा : “ओंकारने आधीच सांगितलं असतं तर…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दिग्दर्शक स्पष्टच बोलले

बिग बॉस या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणून वीणा जगतापकडे पाहिले जाते. बिग बॉस मराठी २ हे पर्व शिव आणि वीणा यांच्या लव्हस्टोरीमुळे चांगलाच गाजला. या दोघांच्या केमिस्ट्रीमुळे बिग बॉसला चार चांद लागले होते. विशेष म्हणजे वीणाने शिवच्या नावाचा टॅटूही हातावर गोंदवून घेतला होता. तसेच शिव बिग बॉसचा विजेता ठरल्यानंतर तिने जंगी सेलिब्रेशनही केले होते. मात्र काही महिन्यांनी त्यांचा ब्रेकअप झाला होता. त्यानंतर आता ते पुन्हा एकत्र येणार का? याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.  

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 08:48 IST
Next Story
Video : “तुझ्या पाया पडतो पण…” मांडीवर बसली, खांद्यावर टाकला हात; प्रसादच्या जवळ जाण्याचा राखी सावंतचा प्रयत्न