Vijayendra Kumeria Divorce : टीव्ही विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ‘उडान’ फेम अभिनेता विजयेंद्र कुमेरिया याचा घटस्फोट झाला असून अभिनेत्याने स्वतः या बातमीला दुजोरा दिला आहे. विजयेंद्रचे लग्न प्रीती भाटियाशी झाले होते आणि त्यांना ११ वर्षांची किमया नावाची मुलगी आहे.
गेल्या काही वर्षांपासून विजयेंद्रच्या वैवाहिक आयुष्यात सगळं आलबेल नसल्याच्या चर्चा होत होत्या. कारण प्रीती भाटिया मुलीबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत होती. तसेच विजयेंद्रच्या अकाउंटवरही त्याचे व त्याच्या मुलीचेच फोटो, व्हिडीओ दिसायचे. त्यामुळे प्रीती व विजयेंद्रच्या घटस्फोटाची चर्चा व्हायची, पण दोघेही याबद्दल बोलणं टाळत होते. आता विजयेंद्रने स्वतः ४ वर्षांपूर्वी पत्नीपासून विभक्त झाल्याची माहिती दिली.
विजयेंद्र कुमेरियाचा घटस्फोट
विजयेंद्र कुमेरिया याने प्रीती भाटियापासून विभक्त झाल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब केलंय. ते गेल्या चार वर्षांपासून वेगळे राहत आहेत. ‘टेली टॉक इंडिया’ला दिलेल्या एका मुलाखतीत विजयेंद्रने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल भाष्य केलं. या जोडप्याला किमाया नावाची ११ वर्षांची मुलगी आहे.
प्रीती व विजयेंद्र यांनी एकमेकांना अनफॉलो केलंय. ते एकत्र दिसत नाहीत. तसेच एकदा प्रीतीने ‘आय लव्ह यू’ हे मी ऐकलेली सर्वात खोटी गोष्ट असल्याची पोस्ट तिने एकदा केली होती. दुसरीकडे, विजयेंद्र मात्र लग्न, घटस्फोट, प्रीतीबद्दल जाहीरपणे बोलणं टाळतो. तो बरेचदा लेक किमयाबरोबरचे फोटो व व्हिडीओ पोस्ट करत असतो.
दरम्यान, विजयेंद्र कुमेरिया ‘शास्त्री सिस्टर्स’, ‘उडान’, ‘नागिन 4’, ‘मोह से चल क्या जाये’ आणि ‘आपकी नजरों ने समझा’ या टीव्ही शोसाठी ओळखला जातो.
