‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका काही महिन्यांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आली. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. नुकताच अक्षरा आणि अधिपती यांचा साखरपुडा दिमाखात पार पडला. तर आता या दोघांचं लग्न राजेशाही थाटात संपन्न होत आहे. तर आता या लग्नाबद्दल अक्षराचा खऱ्या आयुष्याचा नवरा विराजस कुलकर्णी याने प्रतिक्रिया दिली आहे.

या मालिकेत अभिनेत्री शिवानी रांगोळे ‘अक्षरा’ ही भूमिका साकारत आहे तर ‘अधिपती’च्या भूमिकेत अभिनेता ऋषिकेश शेलार दिसत आहे. शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णी यांनी गेल्याच वर्षी लग्नगाठ बांधली. तर आपल्या बायकोचं आता पुन्हा एकदा ऑनस्क्रीन लग्न होत आहे म्हणून विराजसने एक खास पोस्ट शेअर केली आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

आणखी वाचा : ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मध्ये रंगणार राजेशाही विवाह सोहळा, अक्षराने घातलेल्या मंगळसूत्राच्या डिझाईनने वेधलं लक्ष

शिवानीची लग्नानंतरची ही पहिलीच मालिका आहे. या मालिकेच्या पहिल्या दिवसापासून विराजसचा तिला मालिकेत काम करण्यासाठी खूप पाठिंबा मिळत आहे. त्याने आत्तापर्यंत तिच्या या मालिकेतील कामाचं अनेकदा कौतुकही केलं. तर आता तिचं ऑनस्क्रीन लग्न होणार असल्यामुळे त्याने एक पोस्ट शेअर केली. विराजसने त्याचा शिवानीचा आणि ऋषिकेश शेलारचा एक अनसिन फोटो पोस्ट केला. या फोटोमध्ये ऋषिकेश शिवानीला स्वतःकडे खेचताना दिसत आहे. तर ऋषिकेश तिला खेचत असल्यामुळे विराजसने शिवानीला घट्ट धरून ठेवल्याचं दिसत आहे. हा एक मजेशीर फोटो पोस्ट करत त्याने लिहिलं, “मैं मेरी अक्षरा को नहीं जाने दूंगा| अधिक्षराच्या लग्नाला यायचं हं! आजचा दोन तासांचा महाएपिसोड बघायला विसरू नका संध्याकाळी 7 वाजता फक्त झी मराठीवर.”

हेही वाचा : नितीन देसाई यांच्या N.D Studio मध्ये होतंय अक्षरा-अधिपतीच्या लग्नाचं शूटिंग, अनुभव सांगत दोघं म्हणाले, “हा सेट…”

तर आता विराजसने शेअर केलेली ही पोस्ट त्या तिघांच्याही चाहत्यांना खूप आवडली आहे. या फोटोवर कमेंट करत चाहते भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत.

Story img Loader