मुंबई फिल्मसिटीमध्ये मालिकांच्या सेटवर बिबटे शिरण्याचं प्रमाण वाढलं आहे. काही दिवसांपूर्वी एका हिंदी मालिकेच्या सेटवर बिबट्या शिरल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर आता मराठी मालिकेच्या सेटवर बिबट्या शिरल्याचं समोर आलंय. सेटवरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये बिबट्या आल्यानंतर सेटवर लोक पळताना पाहायला मिळत आहे.

रणदीप हुडाने एक ग्लास दुध अन् खजूर खाऊन घटवलं २६ किलो वजन? खुलासा करत म्हणाला, “मी स्पष्ट…”

friends
वेड्या दोस्तीतील शहाणीव…
2nd October Rashi Bhavishya & Panchang
२ ऑक्टोबर पंचांग: सर्वपित्री अमावस्या कोणासाठी ठरणार शुभ?…
How to Break a Wafer Packet: Viral Video Shows the Right Way
वेफर्सचे पॅकेट असे फोडावे, हे तुम्हाला वयाच्या कोणत्या वर्षी समजले?
an old lady proposed his his old husband by giving rose
“शामराव डार्लिंग, आय लव्ह यू” गुलाबाचं फुल देऊन आजीने केलं आजोबांना भन्नाट प्रपोज, VIDEO एकदा पाहाच
balya dance traditional folk dance from kokan
Video : कोकणकरांच्या जिव्हाळ्याचा विषय… बाल्या डान्स एकदा पाहाच, Video होतोय व्हायरल
Train Accident Viral Video in marathi
ट्रेनच्या दरवाजाला लटकून करत होती व्हिडीओ शूटिंग, अचानक आला विजेचा खांब अन् …;Video मध्ये पुढे जे घडलं ते फार भयंकर
Vande Bharat sleeper trains Nagpur to pune
खरंच नागपुर ते पुणे वंदे भारत स्लीपर ट्रेन १५ सप्टेंबरपासून सुरू होणार? आलिशान ट्रेनचा Video होतोय व्हायरल
why homemade bhaji and bhakari are best | Viral Video
“…म्हणून घरची भाजी भाकरी सगळ्यात बेस्ट” सोशल मीडियावर पाटी होतेय व्हायरल, पाहा VIDEO

काल (२६ जुलै रोजी) मुंबईतील गोरेगाव फिल्मसिटीमध्ये एका मराठी टीव्ही मालिकेच्या सेटवर बिबट्या आपल्या बछड्यासह घुसला. ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश श्यामलाल गुप्ता व्हिडीओ शेअर करत म्हणाले, “सेटवर २०० हून अधिक लोक उपस्थित होते, एखाद्याला जीव गमवावा लागला असता. गेल्या १० दिवसांत बिबट्या शिरल्याची ही तिसरी किंवा चौथी घटना आहे. सरकार यावर ठोस उपाययोजना करत नाहीये.”

या बिबट्याला पाहून उपस्थितांची तारांबळ उडाल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. लोक सैरावैरा पळत आहेत. तसेच मालिकेच्या सेटवर बिबट्या चालत जाताना दिसत आहे. अचानक बिबट्या शिरल्याचं पाहून लोक घाबरले होते.

“त्याला अभिनयाचा अ देखील येत नाही आणि तो…”, ‘गदर २’ चा ट्रेलर पाहून अभिनेत्याने उडवली खिल्ली

दरम्यान, काही दिवसांपूर्वी ‘कलर्स’ वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या ‘नीरजा’ या मालिकेच्या सेटवर बिबट्या आला होता. त्यानंतर अभिनेता शोएब इब्राहिमच्या ‘अजूनी’ मालिकेच्या सेटवर बिबट्याचा वावर पाहायला मिळाला. मालिकेचे शूट सुरु असताना अचानक सेटवर बिबट्या आल्याने एकच गोंधळ उडाला होता. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.