रामानंद सागर यांच्या ‘रामायण’मध्ये श्रीरामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल यांची चाहत्यांमध्ये आजही तेवढीच क्रेझ आहे. आजही देशभरात त्यांचे असंख्य चाहते आहेत. एकेकाळी अशी वेळ होती त्यांच्या या भूमिकेमुळे देशभरात कुठेही गेल्यावर लोक त्यांना नमस्कार करत असत. आजही अनेकदा असं घडतं हे नुकत्याच व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे लक्षात आलं. नुकतेच अरुण गोविल एअरपोर्टवर दिसले. यावेळचा त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

अरुण गोविल एअरपोर्टवरून बाहेर पडत असतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. ज्यात एक महिला अक्षरशः त्यांच्या पायावर डोक ठेवून त्यांना नमस्कार करताना दिसत आहे. भगव्या रंगाच्या साडीतील एक महिला अरुण गोविला यांना भेटायला आली होती आणि तिने एक शालही आली होती जी अरुण गोविल यांनी पुन्हा तिला दिली. ही महिला त्याच्या पायावर डोकं ठेवून त्यांना नमस्कार करतेय आणि बरेचदा सांगूनही तिथून उठताना दिसत नाहीये.

pune video | Puneri Kakas Unique Style
Pune Video : पुणेरी काकांची स्टाईल चर्चेत! पुणेकरांनो, तुम्ही कधी पाहिले का या काकांना? Video होतोय व्हायरल
10th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१० सप्टेंबर पंचाग: अनुराधा नक्षत्रात सुखाने भरेल तुमची झोळी! प्रिय व्यक्तीची भेट तर व्यापारात होईल मोठा फायदा; वाचा तुमचे भविष्य
prank with sandwich seller | Funny Viral Video
“हे सँडविच कोणी बनवले?” तरुणाने जोराने ओरडत विचारले, विक्रेता घाबरत पुढे आला अन्… पाहा व्हायरल VIDEO
Mumbai local video of some girls dancing on a marathi song Khandalyachya Ghatat Gadi Chale Zokaat in mumbais local train is going viral
मुंबई लोकलमध्ये “खंडाळ्याच्या घाटात गाडी चाले…” गाण्यावर तरुणींचा भन्नाट डान्स; VIDEO तुफान व्हायरल
Giving Amazing poses for photos Cute little girl
“स्माईल प्लिज”, वडिलांच्या मागे दुचाकीवर बसून गोंडस चिमुकली फोटोसाठी देतेय भन्नाट पोझ, Video पाहून चेहऱ्यावर येईल हसू
Udupi woman
Udupi Rape Case : इन्स्टाग्रामवरील मैत्री महागात! मित्राने दारू पाजून तरुणीवर केला बलात्कार; भाजपाकडून ‘लव्ह जिहाद’चा आरोप
success story police officer competitive examination education government service mpsc upsc marathi onkar gujar
VIDEO: अखेरचा हा तुला दंडवत…दीड फुटाचा डेस्क अन् त्यावर गाळलेला घाम; सहाय्यक कृषी अधिकाऱ्याची पोस्ट व्हायरल
Mumbai Local Train Video Viral
मुंबई लोकलच्या ‘तिच्या’ पहिल्याच प्रवासात काय घडलं? विदेशी तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

आणखी वाचा- Video: जपानी दिग्दर्शकाला रामायणाची भुरळ; ‘Breaking Bad’ च्या ‘या’ स्टारने दिला श्रीरामांचा आवाज

आयएएस सुमिता मिश्रा यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये अरुण गोविल स्वतःची ट्रॅव्हलर बॅग घेऊन एअरपोर्टच्या बाहेर निघताना दिसत आहेत. तर समोर त्यांचे चाहते त्यांच्या स्वागतासाठी उभे असलेले दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना सुमिता यांनी लिहिलं, “तुमची लोकांच्या मनातील प्रतिमा हिच तुमची महानता आहे.”

आणखी वाचा- ‘रामायण’ फेम अरुण गोविल यांनी खरेदी केली लग्झरी कार, चाहते म्हणाले “प्रभु कैसा वाहन ले आए”

सुमिता यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं, “रामायण मालिकेला ३५ वर्षे होऊन गेली पण रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल आजही सर्वांसाठी प्रभू श्रीरामच आहेत. हा भावुक करणारा क्षण होता.” हा व्हिडीओ अरुण गोविल यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरूनही शेअर केला आहे. व्हिडीओमधील महिला अरुण गोविल यांना पाहून खूपच भावुक झालेली दिसत आहे.