Vishakha Subhedar shares Poem: विशाखा सुभेदार सोशल मीडियावर सक्रिय असतात. आता त्यांनी नुकताच एक व्हिडिओ शेअर केलाय. व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी कविता सादर केली आहे.
“माणसांना दगड व्हायला कसं जमलं हे देवालाही नाही कळलं”
व्हिडीओमध्ये त्या म्हणाल्या, “देव चुकला वाटतं माणूस घडवताना, देव खरंच चुकला वाटतं माणूस घडवताना…
दगडांना देव केलं पण, माणसांना दगड व्हायला कसं जमलं हे देवालाही नाही कळलं,
देव खरंच चुकला वाटतं माणूस घडवताना…
हात जोडायला शिकवलं पण धरायला नाही,
डोळे ओले व्हावे म्हणून भावना दिल्या, पण या हलकट माणसाने या भावनांचासुद्धा व्यवहार करून टाकला,
देव खरंच चुकला वाटतं माणूस घडवताना..
पुढे त्या म्हणाल्या, “ज्यांनी मनं जपली ते हरले
आणि ज्यांनी मुखवटे जपले ते पुढे गेले
आज चांगुलपणा मूर्खपणाचा दुसरं नाव झालाय आणि प्रामाणिकपणा पराभवाचं,
खरंच देव चुकला वाटतं कारण त्यांना माणसाला हृदय दिलं..
पण तर हृदयाचे वजन पैशापेक्षा हलकं असेल,
हे बिचाऱ्या देवालाही नाही कळलं
देव खरंच चुकला वाटतं माणूस घडवताना..
खरंच चुकलाच देव माणूस घडवताना..
हा व्हिडीओ शेअर करताना विशाखा सुभेदार यांनी लिहिले, “कधी कधी कविता त्या क्षणाच देणं असते. ही मी लिहिलेली कविताही तशीच आहे.”
विशाखा सुभेदार यांच्या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स करत त्यांचे कौतुक केले आहे. “वाह! किती सरळ शब्दात आजच्या परिस्थितीचा आरसा दाखवलात”, “ताई खूप सुंदर, सत्य परिस्थिती सांगितली”, “विशाखा ताई, तुम्ही आजची खरी परिस्थिती इतक्या सुंदर, स्पष्ट आणि परखड शब्दांत मांडलीत. मनापासून वाटलं की ही केवळ तुमची मांडणी नाही. तर, आजच्या वास्तवाचं जिवंत प्रतिबिंब आहे. तुमचे विचार मनाला भिडले आणि खूप काही विचार करायला लावून गेले”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.
