wagle ki duniya serial star cast meet cm eknath shinde on completing 500 episodes spg 93 | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी केलं 'वागले की दुनिया' मालिकेचं कौतुक! म्हणाले,"मी सामान्‍य माणसाच्या जीवनात..." | Loksatta

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी केलं ‘वागले की दुनिया’ मालिकेचं कौतुक! म्हणाले, “मी सामान्‍य माणसाच्या जीवनात…”

५०० एपिसोड्सचा टप्‍पा पूर्ण करणे हे आमच्‍या टीमसाठी मोठे यश आहे

cm eknath shinde
wagle ki duniya star cast meet mahaharashtra cm eknath shinde

मोठ्या पडद्यावरील कलाकारांच्या रोज बातम्या येताच असतात मात्र छोट्या पडद्यावरील कलाकारदेखील चर्चेत असतात. टीव्ही जगतात आज अनेक मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. सोनी सबवरील मालिका ‘वागले की दुनिया ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. या मालिकेने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. मालिका ५०० भागांचा टप्‍पा पूर्ण करत असताना कलाकार व टीमने महाराष्‍ट्राचे माननीय मुख्‍यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

डेली सोप प्राकृत रोज काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न मालिकेचे लोक करत असतात. ‘वागले की दुनिया या मालिकेत मध्‍यमवर्गीय कुटुंबाच्‍या संघर्षाला आणि त्‍यांच्‍या उपायांना सादर करते, ज्‍यामधून प्रेक्षकांना प्रत्‍येकवेळी नवीन बोध मिळतो. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मालिकेला मिळाल्याने मालिकेतील कलाकारदेखील आनंदी आहेत. हा टप्‍पा साजरा करण्‍यासाठी आठवडाभर अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले आहे, जसे पूजा, सेलिब्रेटरी लंच आणि सेटवर केक कापण्‍याचा समारोह, त्यातच टीमने महाराष्‍ट्राचे माननीय मुख्‍यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांची मुंबईतील मलबार हिल येथे त्‍यांचे अधिकृत निवासस्थान वर्षा बंगल्‍यावर भेट घेत मोठ्या उत्‍साहात साजरीकरण केले.

Photos: ‘३६ गुण’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद; संतोष जुवेकरची डोंबिवलीच्या चित्रपटगृहात हजेरी

या निमित्ताने मालिकेबद्दल मा. मुख्‍यमंत्री श्री. एकनाथ शिंदे म्‍हणाले, “मालिका ‘वागले की दुनिया’ सामान्‍य माणसाच्‍या दैनंदिन संघर्षांना दाखवते. महाराष्‍ट्र राज्‍याचा मुख्‍यमंत्री म्‍हणून मी सामान्‍य माणसाच्‍या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्‍याप्रती वचनबद्ध आहे. मालिका ‘वागले की दुनिया’ने सामान्‍य माणसाच्‍या जीवनाला सादर करत आणि अनेक सामाजिक समस्‍यांशी संबंधित उपाय दाखवत अद्भुत कामगिरी केली आहे. मला आनंद होत आहे की, चॅनेल व निर्मात्‍यांनी असे उपक्रम हाती घेतले आहेत. मी यशस्‍वीरित्या ५०० भाग पूर्ण करण्‍यासाठी या मालिकेच्‍या टीमचे अभिनंदन करतो आणि त्‍यांच्‍या भावी प्रयत्‍नांसाठी शुभेच्‍छा देतो.’’

मराठमोळा अभिनेता सुमित राघवन या मालिकेत राजेश वागले ही भूमिका साकारत आहे तो असं म्हणाला की “५०० भागांचा टप्‍पा पूर्ण करणे हे आमच्‍या टीमसाठी मोठे यश आहे आणि मी यासारख्‍या मालिकेची निर्मिती करण्‍यासाठी सोनी सब टीम व जेडी मजेठिया यांचे आभार मानतो.” मालिकेचे निर्माते म्हणाले, ‘’आम्‍हाला महाराष्‍ट्राचे माननीय मुख्‍यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्‍यासोबत आमचा उत्‍साहवर्धक ५०० एपिसोड्सचा टप्‍पा शेअर करण्‍याचा आनंद होत आहे. सुमीत राघवन, परीवा प्रणती, भारती आचरेकर, अंजन श्रीवास्तव, चिन्मयी साळवी, शीहान कपाही, शोचे निर्माते जेडी मजेठिया आणि सोनी सबचे बिझनेस हेड श्री. नीरज व्यास मुख्यमंत्र्यांबरोबर बैठकीला उपस्थित होते.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-11-2022 at 19:35 IST
Next Story
“आज तिने मान पकडलीय, उद्या ती…” शिव ठाकरेची बहिण संतापली