Actress Sara Khan: टीव्ही अभिनेत्री आणि ‘बिग बॉस’ फेम सारा खान एकेकाळी टीव्हीवरील आघाडीची अभिनेत्री होती. टीव्ही इंडस्ट्रीत सारा खानचा जलवा होता. एका मालिकेने तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली होती. या साराचा आज (६ ऑगस्ट) वाढदिवस आहे. तिचा जन्म ६ ऑग्सट १९८९ ला मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये झाला होता. ३५ वर्षांची सारा तिच्या अभिनयापेक्षाही वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली. साराने टीव्ही शोमध्ये एका अभिनेत्याशी लग्न केलं होतं, पण अवघ्या दोन महिन्यात तिचा घटस्फोट झाला होता. 'सपना बाबुल का बिदाई'मुळे मिळाली ओळख सारा खानने १५ वर्षांहून जास्त काळापासून इंडस्ट्रीत सक्रिय आहे. एकेकाळी टीव्हीवरील 'संस्कारी सून' अशी तिची ओळख होती. २००७ मध्ये 'सपना बाबुल का बिदाई' या मालिकेत तिने काम केलं होतं. यात ती 'साधना'च्या भूमिकेत होती. या मालिकेनंतर साराने मागे वळून पाहिलं नाही. तिने 'कवच' व 'ससुराल सिमर का' सारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं. श्वेता बच्चनला खूप आवडायचा वहिनी ऐश्वर्या रायचा एक्स बॉयफ्रेंड; त्याची ‘ही’ वस्तू जवळ घेऊन झोपायची, स्वतःच केलेला खुलासा 'सपना बाबुल का बिदाई' या मालिकेत साध्या सूनेची भूमिका करून सारा खानची लोकप्रियता खूप वाढली, ती घराघरांत ओळखली जाऊ लागली. यानंतर तिला लोकप्रिय व वादग्रस्त रिॲलिटी शो 'बिग बॉस'ची ऑफर मिळाली. ती बिग बॉसच्या चौथ्या सीझनमध्ये सहभागी झाली होती. अभिनेत्री सारा खान (फोटो - इन्स्टाग्राम) शोमध्ये केलं होतं लग्न सारा खानने लहान वयात लग्न केलं होतं, पण हे लग्न फार काळ टिकलं नाही. 'बिग बॉस'च्या घरात सारा अभिनेता अली मर्चंटच्या प्रेमात पडली होती. या दोघांनी २०१० मध्ये बिग बॉसच्या घरात लग्न केलं होतं. लग्नाला झाली १० वर्षे, आई होऊ शकत नाहीये प्रसिद्ध अभिनेत्री; म्हणाली, “माझ्या अन् पतीच्या वयातील अंतरामुळे…” दोन महिन्यात झाला होता घटस्फोट बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर दोघांचं बिनसलं. अवघ्या दोन महिन्यात सारा खान व अली मर्चंट यांचा घटस्फोट झाला. सारा व अलीने लग्न केलं तेव्हा बऱ्याच लोकांनी या लग्नाला पब्लिसिटी स्टंट म्हटलं आहे. पण लग्नाचा निर्णय हा सारा व अलीचा स्वतःचा होता असं स्पष्टीकरण चॅनलने दिलं होतं. १९ वर्षांचा संसार, बॉलीवूड अभिनेत्रीने पतीचं आडनाव हटवलं अन् चित्रपट झाला सुपरहिट; म्हणाली… अलीने केली दोन लग्नं, तर साराचे ब्रेकअप घटस्फोटानंतर अलीने दोन लग्नं केली. सारापासून विभक्त झाल्यावर त्याने अनम नावाच्या तरुणीशी लग्न केलं पण त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर अलीने २०२३ मध्ये अँडलीब झैदी हिच्याशी लग्न केलं. दुसरीकडे अलीपासून घटस्फोट घेतल्यावर सारा शांतनू राजेला डेट करत होती. शांतनू पायलट होता. दोघेही चार वर्षे रिलेशनशिपमध्ये होते व त्यांच्या लग्नाच्या चर्चा सुरू होत्या, पण डिसेंबर २०२३ मध्ये त्यांनी सोशल मीडियावर ब्रेकअपची घोषणा केली.