scorecardresearch

“ते कर्ज मी आजवर… ” मित्राकडून उधार घेतलेल्या पैशांबद्दल सलमान खानने केला होता खुलासा

मला कल्पना नव्हती त्या पैश्याच्या बदल्यात मला हे करावं लागेल.

“ते कर्ज मी आजवर… ” मित्राकडून उधार घेतलेल्या पैशांबद्दल सलमान खानने केला होता खुलासा
bollywood actor

बॉलिवूडचा दबंग अभिनेता म्हणजे सलमान खान. गेली अनेकवर्ष तो बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. आज देशातच नव्हे तर जगभरात त्याचे अनेक चाहते आहेत. सलमान चित्रपटांमध्ये आपल्याला दिसतोच मात्र तो आता बिग बॉसच्या १६व्या पर्वात सूत्रसंचालक म्हणून दिसणार आहे. सलमान खानने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.सलमानचा मित्र परिवार मोठा आहे. अगदी बॉलिवूडपासून ते मराठीतील कलाकार त्याचे मित्र आहेत. चित्रपटसृष्टीसोडून त्याचे मित्र आहेत. कोणत्याही मित्राच्या मदतीला धावून तो जातो, अशाच एका मित्राचा त्याने किस्सा सांगितला आहे.

कपिलशर्माच्या कार्य्रक्रमात अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी येत असतात. आपापल्या करियरविषयी, खाजगी आयुष्याविषयी मनमोकळेपणाने बोलत असतात. सलमान खानदेखील अनेकवेळा या कार्यक्रमात येऊन गेला आहे. सलमान एकदा या कार्यक्रमात आला असताना कपिलने त्याला विचारले की ‘तू कधी कोणाकडून उधारीत पैसे घेतले आहेस का? कोणत्या मित्राकडून वगरे’? त्यावर सलमानने आपल्या स्टाईलमध्ये उत्तर दिले की ‘हो घेतले आहेत आजतागायत मी उधारी चुकवत आहे. माझ्या एका मित्राच्या मुलाला मी नुकतेच लाँच केले आहे. लहानपणी माझ्याकडून एक मोठी चूक झाली होती ती म्हणजे मी त्याच मित्राकडून २००० रुपये उधारीवर घेतले होते. त्याकाळात माझ्याकडे पैसे नव्हते मला गाडीत पेट्रोल भरायचे होते, म्हणून त्या मित्राकडून पैसे घेतले होते मला कल्पना नव्हती त्या पैश्याच्या बदल्यात मला हे करावं लागेल’. सलमान खानचा हा किस्सा ऐकताच प्रेक्षकांमध्ये हशा पिकला.

कपिल शर्माच्या ‘त्या’ खोचक प्रश्नावर सैफ म्हणाला, “माझ्या एका हातात राधिका आणि…”

सलमानने १९८८ साली ‘बीबी हो तो ऐसी’ या चित्रपटातून पदार्पण केले होते. मात्र त्याला ओळख मिळाली ते १९८९ साली आलेल्या ‘मैने प्यार किया’ या चित्रपटातून, यानंतर सलमानने मागे वळून बघितले नाही. आजवरच्या कारकिर्दीत त्याने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. दबंगसारख्या चित्रपटातून एक वेगळा ट्रेंड त्याने बॉलिवूडमध्ये आणला. २०२१ साली आलेल्या ‘अंतिम’ या चित्रपटात तो दिसला होता. मराठीतला ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाचा हा रिमेक होता.

सलमान लवकरच एका दाक्षिणात्य चित्रपटात दिसणार आहे. मेगास्टार चिरंजीवी याच्याबरोबर तो ‘गॉडफादर’ या चित्रपटात दिसणार आहे. तसेच तो लवकरच ‘टायगर ३’मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय तो शाहरुख खानच्या ‘पठाण’मध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या तो ‘किसी का भाई किसी की जान’ आणि बिग बॉस १६ च्या चित्रीकरणात व्यस्त आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या