‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’च्या नव्या पर्वाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे या पर्वाची चांगलीच चर्चा सुरू आहे. या कार्यक्रमातील लिटिल चॅम्प्सनं त्यांच्या आवाजाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे लिटिल चॅम्प्सचा देखील एक वेगळा चाहता वर्ग तयार झाला आहे. सध्या या पर्वातील एका लिटिल चॅम्प्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून नेटकरी कौतुक करत आहेत.

हेही वाचा- Rahul Vaidya And Disha Parmar: लक्ष्मी आली घरी! राहुल वैद्यच्या आई-वडिलांनी नातीचं केलं असं स्वागत; पाहा व्हिडीओ

‘झी मराठी’च्या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ नुकताच शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत ऋचा गणपती बाप्पाला २१ मोदकांचा नैवेद्य का दाखवतात? याचं उत्तर देताना पाहायला मिळत आहे. ऋचा सांगते की, “मी असं ऐकलं की, पूर्वीच्या काळात देवांतक आणि नरांतक असे राक्षस होते. त्यांनी खूप तपश्चार्या केल्यामुळे देवांनी त्यांना खूप शक्ती दिली होती. पण ते त्या शक्तीचा दुरुपयोग करत होते. म्हणजे लोकांना मारायचे. ज्याप्रमाणे रावणाचं हनन करण्यासाठी राम बाप्पांनी जन्म घेतला. कंसाचा हनन करण्यासाठी कृष्ण बाप्पांनी जन्म घेतला. तसेच वाईट वृत्तीचे देवांतक आणि नरांतक यांचं हनन करण्यासाठी कश्यप ऋषी आणि आदिती माता यांच्या पोटी गणपती बाप्पांनी विनायक या नावाने जन्म घेतला.”

हेही वाचा – ‘आता होऊ दे धिंगाणा २’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस; पाहा जबरदस्त प्रोमो

“त्या दोघांचं हनन करायचं म्हणजे युद्ध होणार ना. त्यासाठी विनायक बाप्पांनी २० सैनिक घेतले. तर आता २०चं का? कारण पूर्वीच्या काळी १० हाताची बोटं आणि १० पायाची बोटं असे मिळून २०. तेव्हाच्या काळी २० या आकड्यांमध्येच मोजणी व्हायची. म्हणून त्यांनी २० सैनिक घेतले. त्या २० गणांचा एक कॅप्टन म्हणजे गणपती बाप्पा. तर असे २० अधिक १ म्हणजेच २१. म्हणून प्रत्येक गणांना म्हणजेच सैनिकांना आणि बाप्पांना ते मोदक असतात. बाप्पाचं सगळे २१ मोदक खातं नाहीत. बाप्पा हा एकच मोदक खातो. पण प्रत्येक मोदक एकेका गणाला आणि एक बाप्पाला असे मिळून ते २१ मोदक, २१ लाडू, २१ दुर्वो, २१ करंजा असं आपण २१ आकड्यांमध्ये त्यांना अर्पण करतो.”

हेही वाचा – ‘स्टार प्रवाह’वर लवकरच येणार नवी मालिका; निर्मिती सावंत आणि सिद्धार्थ चांदेकरने केलं जाहीर

ऋचाचं हे उत्तर ऐकून सूत्रसंचालिका मृण्मयी देशपांडे थक्क होते आणि म्हणते की, “मला थोडं पाणी मिळेल का? बाप्पा रे ही मुलगी तोफ आहे.” तेवढ्यात परीक्षक सलील कुलकर्णी मृण्मयीला म्हणतात की, “तुला २१ ग्लास पाणी प्यावं लागेल. ये इकडे” यावर मृण्मयी म्हणते की, “मला २१ ग्लास पाणी आणि हिला २१ तोफांची सलामी, अशीच दिली पाहिजे.”

हेही वाचा – मुंबई, पुणे नव्हे तर महाराष्ट्रातील ‘हे’ ठिकाण गौतमी पाटीलला आवडतं; म्हणाली…

हेही वाचा – Video: ‘ठरलं तर मग’ मालिकेतील अर्जुनची एक भुवई का असते वर? निर्मिती सावंत यांनी सांगितलं त्यामागचं रहस्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऋचाचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केलं आहे. एका नेटकरीनं लिहीलं की, “संस्कार…..आई वडिलांनी जे जपलं ते तिच्यात उतरलं.” तर दुसऱ्या नेटकऱ्यानं लिहीलं आहे की, “निशब्द..खूप छान बाळा” तसेच तिसऱ्या नेटकरीनं लिहीलं आहे की, “क्या बात है, कौतुक तिच्या आई बाबांचे आणि ऋचाचे पण.”