Makers of TMKOC on Bhavya Gandhi comeback: असित मोदी निर्मित ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका गेली १७ वर्षे अविरतपणे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. ही मालिका २००८ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेतील पात्रांचा वेगळा प्रेक्षकवर्ग आहे, त्यामुळे त्या पात्रांशी, ते पात्र साकारत असलेल्या कलाकारांशी प्रेक्षकांचे एक वेगळे नाते तयार होते. जेव्हा हे कलाकार मालिका सोडतात आणि दुसरे कलाकार ती भूमिका साकारण्यास सुरुवात करतात, त्यावेळी दुसऱ्या कलाकाराला त्या भूमिकेत स्वीकारणे कठीण होते. अनेकदा आधी भूमिका साकारलेल्या कलाकाराची आणि नंतरच्या कलाकाराची तुलना केली जाते.
खरंच भव्य गांधी परतणार का?
अभिनेता भव्य गांधीने २००८ मध्ये तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेत बालकलाकार म्हणून काम केले. तो २०१७ पर्यंत या मालिकेत टपू ही भूमिका साकारत होता. मात्र, २०१७ मध्ये त्याने या मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भव्यनंतर ही भूमिका अभिनेता नितीश भलूनी साकारत आहे. त्यालादेखील प्रेक्षकांचे मोठे प्रेम मिळत आहे.
आता नुकतीच भव्यने मुलाखत दिली. यावेळी त्याला पुन्हा मालिकेत जायला आवडेल का, यावर भव्यने मला तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेत पुन्हा काम करायला आवडेल, असे म्हटले होते. त्यानंतर भव्य गांधी पुन्हा मालिकेत परतणार अशा चर्चा मोठ्या प्रमाणात होताना दिसल्या.
आता या चर्चांनंतर मालिकेच्या प्रोडक्शनने अधिकृत निवेदन जाहीर केले आहे. नीला फिल्म प्रोडक्शनने लिहिले की, भव्य गांधी मालिकेत परत येणार नाही, ही माहिती चुकीची आहे. सध्या मालिकेत टपूची भूमिका साकारणारा नितीश बलुनी उत्तम काम करत आहे. त्याला प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे. नीला फिल्म प्रोडक्शन्स अंतर्गत असित कुमार मोदी यांनी तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेची निर्मिती केली आहे. ही मालिका सर्व पिढ्यांतील प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. चाहत्यांचे मालिका आणि त्यातील पात्रांबद्दलचे प्रेम तसेच पाठिंबा आमच्यासाठी मोलाचा आहे. पुढे असेही लिहिले की, कलाकारांबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केवळ नीला फिल्म प्रॉडक्शन्सद्वारे केली जाईल.
दरम्यान, सध्या भव्य गांधी गुजराती चित्रपटांमध्ये काम करत आहे.
