Yami Gautam & Madhuri Dixit : ‘नव्या नवेली’ या सिनेमात बॉलीवूड अभिनेत्री यामी गौतमसह अभिनेता आदिनाथ कोठारे महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. हा सिनेमा येत्या १६ ऑक्टोबरला प्रदर्शित होईल आणि याच निमित्ताने या दोघांनी नुकतीच ‘कोण होणार करोडपती’च्या रंगमंचावर उपस्थिती लावली होती. यावेळी यामीने निळ्या रंगाची सुंदर साडी नेसून करोडपतीच्या मंचावर एन्ट्री घेतल्याचं पाहायला मिळालं.

शोमध्ये येताच यामीने ‘खूप छान वाटतंय’ असं म्हणत माधुरीशी मराठीत संवाद साधला. त्यामुळे तिचं ‘धकधक गर्ल’नेही कौतुक केलं. यानंतर खेळ सुरू झाल्यावर माधुरीने यामीला विचारलं, “तुला कोणता मराठी शब्द आवडतो?”

यावर यामी म्हणाली, “असा एक शब्द तर नाहीये पण, मला एक ओळ आवडते…मला उद्या सुट्टी पाहिजे!” खरंतर, यामीचा जन्म हिमाचल प्रदेशच्या बिलासपूरमध्ये झाला. तरीही तिला बऱ्यापैकी मराठी भाषा समजते.

यामीच्या बोलण्यातील गोडवा ऐकून माधुरी म्हणाली, “असं विचारल्यावर कोण सुट्टी देणार नाही.” अगदी आदिनाथने सुद्धा याला सहमती दर्शवल्याचं पाहायला मिळालं.

यामी आणि आदिनाथ येत्या १७ ऑक्टोबरला ‘कोण होणार करोडपती’मध्ये सहभागी होणार आहेत. प्रेक्षकांनी या प्रोमोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.