‘पुष्पा २’ चित्रपटाची सध्या सर्वत्र क्रेझ निर्माण झाली आहे. सुरुवातीला हा चित्रपट येत्या ऑगस्ट महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता त्यामुळे या चित्रपटामधलं “अंगारों का अंबर सा लगता है मेरा सामी” हे गाणं मे महिन्याच्या अखेरीस प्रदर्शित करण्यात आलं होतं. परंतु, आता ‘पुष्पा २’ची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली असल्याचं स्पष्ट झालं आहे. आता अल्लू अर्जुन आणि रश्मिकाचा ‘पुष्पा २’ डिसेंबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. असं जरी असलं तरीही ‘सुसेकी’ गाण्याची लोकप्रियता सर्वत्र कायम आहे.

‘पुष्पा २’मधील ‘सुसेकी’ गाणं हे प्रदर्शित झाल्यावर सर्वत्र ट्रेंड होऊ लागलं. सामान्य लोकांपासून ते बॉलीवूड कलाकारांपर्यंत सगळ्यांना या गाण्याची भुरळ पडली. नेटकरी ट्रेंडनुसार रश्मिका अन् अल्लू अर्जुनसारख्या हुबेहूब हुकस्टेप करून लक्ष वेधून घेऊ लागले. मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी गेल्या काही दिवसांत या गाण्यावर डान्स केल्याचं पाहायला मिळालं. आता या ‘पुष्पा २’च्या गाण्याची राया आणि मंजिरीला देखील भुरळ पडली आहे.

हेही वाचा : शत्रुघ्न सिन्हा नाराज, लाडक्या लेकीच्या लग्नाला जाणार नाहीत? अभिनेत्रीचे मामा म्हणाले, “सोनाक्षी आणि तिच्या कुटुंबात…”

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर गेल्या महिन्यात ‘येड लागलं प्रेमाचं’ ही नवीन मालिका चालू झाली. यामध्ये अभिनेत्री पूजा बिरारीने ‘मंजिरी’ तर, ‘बिग बॉस मराठी’ विजेता अभिनेता विशाल निकमने ‘राया’ हे पात्र साकारलं आहे. या दोघांनी ‘सुसेकी’ गाण्यावर एकदम ‘पुष्पा’ स्टाइलने जबरदस्त डान्स केला आहे. रायाचा लूक काहीसा अल्लू अर्जुनला मिळता जुळता असल्याने नेटकऱ्यांनी सुद्धा राया-मंजिरीच्या या भन्नाट डान्सवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

पूजा बिरारीने या व्हिडीओला “राजिरी ( राया + मंजिरी ) सुनकर फ्लॉवर समझा क्या? फायर हैं हम!” असं कॅप्शन दिलं आहे. नेटकऱ्यांनी देखील या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. “नाही नाही फ्लॉवर नाही तुम्ही फायरच आहात!”, “किती गोड डान्स केला”, “कडक जमलंय” अशा प्रतिक्रिया राया-मंजिरीच्या व्हिडीओवर त्यांच्या चाहत्यांनी केल्या आहेत.

हेही वाचा : तारीख ठरली! ‘झी मराठी’वर ‘लाखात एक आमचा दादा’ मालिका ‘या’ दिवशी सुरू होणार, पोस्टरमध्ये दडलंय उत्तर…

दरम्यान, पूजा बिरारी आणि विशाल निकम यांची ‘येड लागलं प्रेमाचं’ ही नवीन मालिका २७ मे पासून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. टीआरपीच्या शर्यतीत सुद्धा ही नव्याने चालू झालेली मालिका टॉप १० मध्ये आहे. पूजा-विशालची ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिका दररोज रात्री १०.३० वाजता ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर प्रसारित करण्यात येते.