मुंबईत घर घेणं हे अनेकांचं स्वप्न असतं. काहींना आयुष्यभर मेहनत करूनही हे स्वप्न पूर्ण करता येत नाही, तर काहींना मात्र कमी वयातच मुंबईत स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यात यश येतं. आता टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्रीने अवघ्या २४ व्या वर्षी मुंबईत हक्काचं घर घेतलं आहे. तिने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करून याबाबत माहिती दिली आहे.

मुंबईत घर घेणाऱ्या या अभिनेत्रीचं नाव आदिती भाटिया आहे. आपल्या अभिनयामुळे लोकप्रिय असलेल्या अदितीची वेगळी ओळख सांगायची गरज नाही. अदितीने वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी तिच्या अभिनय करिअरला सुरुवात केली. तिने पहिल्यांदा छोट्या पडद्यावर ‘होम स्वीट होम’ या मालिकेत करिश्माची भूमिका साकारली होती. पण २०१६ मध्ये तिने ‘ये है मोहब्बतें’ या टीव्ही शोमध्ये रुही भल्ला हे पात्र साकारलं आणि ती घराघरांत पोहोचली. आता २४ वर्षांच्या आदिती भाटियाने मुंबईत तिचं नवीन घर घेतलं आहे.

“ती माझी एकुलती एक मुलगी आहे अन्…”, सोनाक्षी-झहीर इक्बाल यांच्या लग्नाबद्दल शत्रुघ्न सिन्हा काय म्हणाले?

आदिती भाटियाने गृहप्रवेश व पूजेचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती पारंपरिक पद्धतीने पूजा करताना दिसत आहे. यावेळी आदितीने डोक्यावर पदर ठेवून पूजा केली. अभिनेत्रीने व्हिडीओ कॉलद्वारे तिच्या आजीला पूजा दाखवली. वयाच्या २४ व्या वर्षी आदितीने फक्त घराचं नाही तर कारचंही स्वप्न पूर्ण केलं. तिने नुकतीच नवीन मर्सिडीज कार खरेदी केली होती आणि आता तिने नवीन घरात गृहप्रवेश केला आहे.

तीन लग्नं, दोन घटस्फोट अन् तिसरी पत्नी रशियन; फिल्मी आहे दाक्षिणात्य सुपरस्टार पवन कल्याण यांचं खासगी आयुष्य

आदिती भाटियाने कमी वयात मोठं यश मिळवलं आहे आणि या सर्व कामगिरीचं श्रेय ती तिच्या आईला देते. “आज मी जे काही आहे ते फक्त माझ्या आईमुळे आहे. मी खूप पैसे खर्च करते, पण माझी आई सर्व गोष्टी सांभाळून घेते, त्यामुळे तिचे मी आभार मानते,” असं अदितीने आईचे फोटो शेअर करत लिहिलं.

अमिताभ, जया व रेखा लाँग ड्राइव्हवर जायचे एकत्र; ‘ते’ दोघेही पुढच्या सीटवर बसायचे अन् मागे…

दरम्यान, अदितीने आजवर अनेक चित्रपट आणि टेलिव्हिजन शोमध्ये काम केलं आहे. ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. तिचे इन्स्टाग्रामवर सहा मिलियनहून जास्त फॉलोअर्स आहेत. टीव्ही इंडस्ट्रीत चांगलं नाव कमावल्यानंतर अदिती भाटिया आता जाहिरातींवर लक्ष केंद्रित करत आहे. याशिवाय ती सोशल मीडिया एन्फ्लूएन्सर आहे. अदिती सोशल मीडियावर तिच्या प्रत्येक पोस्टसाठी मोठी रक्कम आकारते. अभिनेत्री बऱ्याच दिवसांपासून अभिनयापासून दूर आहे पण ती तिचे फोटो व व्हिडिओ शेअर करून तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते.