‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली शिवांगी जोशी छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. चंचल तरुणी ते सोज्वळ सून अशा विविध प्रकारच्या भूमिका तिने मालिकांमधून साकारल्या आहेत. सध्या शिवांगीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यावेळी तिचा तोल गेल्याने ती पडता पडता वाचल्याचे पाहायला मिळत आहे.
नुकतंच विरल भय्यानीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत शिवांगीही तिच्या कुटुंबाबरोबर गाडीतून खाली उतरताना दिसत आहे. यावेळी तिने भगव्या रंगाचा ड्रेस आणि हाय हिल्स घातल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी शिवांगी उतरत असताना तिचा पाय खड्ड्यात पडतो आणि तिचा तोल जातो.
आणखी वाचा : “…आणि आजही मी त्यावर ठाम”, अमृता खानविलकरने सोनाली कुलकर्णीबद्दल मांडलेले थेट मत, म्हणालेली “आम्ही मैत्रिणी…”
यानंतर तिची आई आणि बहिण तिला पडताना रोखते. तर तिचे बाबा तिची चप्पल सरळ करुन देताना दिसत आहेत. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. तिच्या या व्हिडीओवर अनेक नेटकरी चांगल्या वाईट कमेंट करताना दिसत आहेत.
दरम्यान शिवांगी जोशी छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध आहे. २००९ साली ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून तिने आपल्या अभिनय करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर तिने ‘ये प्यार तुने क्या किया’, ‘लव्ह बाय चांस’, ‘ये है आशिकी’, ‘ये रिश्ते है प्यार के’, ‘खेलती है जिंदगी आँख मिचोली’ यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.