Zee Chitra Gaurav Awards 2026 Winner List : मराठी चित्रपटसृष्टीत मानाचा समजला जाणारा ‘झी चित्र गौरव पुरस्कार २०२६’ हा भव्यदिव्य सोहळा नुकताच पार पडला. या संपूर्ण सोहळ्यात प्रेक्षकांना मराठी संस्कृतीचा अभिमान, परंपरेचा ठसा आणि आधुनिकतेची झलक अनुभवायला मिळाली. ‘मराठी गाजलंच पाहिजे!’ ही यंदाची थीम होती.
यंदा ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल ‘जीवनगौरव’ पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. तर, ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या पुरस्काराने अभिनेता-लेखक-दिग्दर्शक चिन्मय मांडलेकरला सन्मानित करण्यात आलं. याशिवाय या सोहळ्यात ‘सर्वोत्कृष्ट चित्रपट’ ठरला आहे ‘आता थांबायचं नाय!’ तर, ‘दशावतार’ चित्रपटाला ‘ब्लॉकबस्टर सिनेमा ऑफ द इयर’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. विजेत्यांची संपूर्ण यादी जाणून घेऊयात…
Zee Chitra Gaurav Awards 2026 – वाचा ३५ विजेत्यांची संपूर्ण यादी
- सर्वोत्कृष्ट चित्रपट : आता थांबायचं नाय!
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : शिवराज वायचळ – आता थांबायचं नाय!
- सर्वोत्कृष्ट अभिनेता : दिलीप प्रभावळकर ( दशावतार ) आणि भरत जाधव ( आता थांबायचं नाय! )
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : अमृता सुभाष – जारण
- जीवन गौरव पुरस्कार – डॉ. जब्बार पटेल
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : सिद्धार्थ जाधव – आता थांबायचं नाय!
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : अनिता दाते – जारण
- सर्वोत्कृष्ट बालकलाकार : मायरा वायकुळ – मुक्काम पोस्ट देवाचं घर
- ब्लॉकबस्टर सिनेमा ऑफ द इयर – दशावतार
- ZEE 5 लोकप्रिय चित्रपट – दशावतार
- ZEE 5 लोकप्रिय सीरिज – देवखेळ
- सर्वोत्कृष्ट अनुरूप जोडी : हृता दुर्गुळे व ललित प्रभाकर – आरपार
- मराठी पाऊल पडते पुढे पुरस्कार : चिन्मय मांडलेकर
- नॅचरल टॅलेंट ऑफ द इयर : वैदेही परशुरामी – संगीत मानापमना
- सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता : समीर चौघुले – गुलकंद
- सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री : ईशा डे – गुलकंद
- सर्वोत्कृष्ट प्रतिभाशाली पदार्पण ( दिग्दर्शन ) : संतोष डावखर – गोंधळ
- सर्वोत्कृष्ट प्रतिभाशाली पदार्पण ( अभिनेता ) : तारानाथ खिरटकर – स्थळ
- सर्वोत्कृष्ट प्रतिभाशाली पदार्पण ( अभिनेत्री ) : नंदिनी चिकटे ( स्थळ ) आणि साजिरी जोशी ( एप्रिल मे ९९ )
- सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक : गुलराज सिंग – आरपार
- सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शक : धीरज भालेराव – जारण
- सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक : अजय गोगावले – दशावतार
- सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका : रौकिनी गुप्ता – उत्तर
- सर्वोत्कृष्ट संवाद : ओंकार गोखले, शिवराज वायचळ, अरविंद जगताप – आता थांबायचं नाय!
- सर्वोत्कृष्ट पटकथा : ओंकार गोखले, शिवराज वायचळ – आता थांबायचं नाय!
- सर्वोत्कृष्ट कथा : क्षितिज पटवर्धन – उत्तर
- मोस्ट ट्रस्टेड फेस ऑफ दी इयर : रेणुका शहाणे – उत्तर
- सर्वोत्कृष्ट गीतकार : क्षितिज पटवर्धन ( उत्तर ) आणि मनोज यादव ( आता थांबायचं नाय! )
- सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत : सौरभ भालेराव – आता थांबायचं नाय!
- सर्वोत्कृष्ट ध्वनीमुद्रण : मंदार कमलापूरकर – जारण
- सर्वोत्कृष्ट संकलन : अभिजीत देशपांडे – जारण
- सर्वोत्कृष्ट छायाचित्रण : अमलेंदू चौधरी – गोंधळ
- सर्वोत्कृष्ट कलादिग्दर्शन : संदीप मेहेर – गोंधळ
- सर्वोत्कृष्ट वेशभूषा : सचिन लोवलेकर – दशावतार
- सर्वोत्कृष्ट रंगभूषा : रोहित महाडिक – दशावतार
दरम्यान, या सगळ्या विजेत्यांवर संपूर्ण कलाविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.
