Zee Marathi Awards 2025 Full Winners List Part 1 and Part 2 : ‘झी मराठी पुरस्कार २०२५’ हा भव्यदिव्य सोहळा नुकताच पार पडला आहे. यावर्षी अभिजीत खांडकेकर आणि मृण्मयी देशपांडे या दोघांनी हा शो होस्ट केला. विविध मालिकांमधील लोकप्रिय जोड्यांचे रोमँटिक परफॉर्मन्स, ‘चला हवा येऊ द्या’ या शोमधील कलाकारांचे भन्नाट स्किट, ज्येष्ठ कलाकारांचा स्पेशल डान्स या सोहळ्यात प्रेक्षकांना पाहायला मिळाला.
यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात ‘लक्ष्मी निवास’ मालिकेने सर्वाधिक पुरस्कार जिंकत बाजी मारली आहे. तर यावर्षी सर्वोत्कृष्ट मालिकेचा बहुमान ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेला मिळाला आहे.
‘झी मराठी’ पुरस्कार सोहळ्याचे विजेते, पाहा संपूर्ण यादी…
- लोकप्रिय मालिका – लक्ष्मी निवास
- सर्वोत्कृष्ट मालिका – सावळ्याची जणू सावली
- लोकप्रिय कुटुंब – दळवी कुटुंब ( लक्ष्मी निवास )
- सर्वोत्कृष्ट कुटुंब – मेहंदळे कुटुंब ( सावळ्याची जणू सावली )
- सर्वोत्कृष्ट लोकप्रिय जोडी – जयंत-जान्हवी ( लक्ष्मी निवास )
- सर्वोत्कृष्ट अनुरुप जोडी – सिद्धू-भावना ( लक्ष्मी निवास )
- सर्वोत्कृष्ट नायिका – सावली ( सावळ्याची जणू सावली )
- लोकप्रिय नायिका – कमळी
- सर्वोत्कृष्ट नायक – सिद्धू ( लक्ष्मी निवास )
- लोकप्रिय नायक – सारंग ( सावळ्याची जणू सावली )
- जीवनगौरव पुरस्कार – डॉ. गिरीश ओक
- सर्वोत्कृष्ट सासरे – श्रीनिवास ( लक्ष्मी निवास )
- सर्वोत्कृष्ट सासू – लक्ष्मी ( लक्ष्मी निवास )
- सर्वोत्कृष्ट जावई – सिद्धू ( लक्ष्मी निवास )
- सर्वोत्कृष्ट सून – वीणा ( लक्ष्मी निवास )
- सर्वोत्कृष्ट आई – मीरा-अंबिका ( तुला जपणार आहे )
- सर्वोत्कृष्ट बाबा – अथर्व – तुला जपणार आहे
- शायनिंग परफॉर्मन्स – लक्ष्मी ( लक्ष्मी निवास )
- नॅचरल टॅलेंट ऑफ द इयर – भावना ( लक्ष्मी निवास )
- सर्वोत्कृष्ट बालकलाकार – अप्पू, गणी, आनंदी, हृतिक, हौसा, वेदा आणि वरद
- सर्वोत्कृष्ट आजी – कमळी
- सर्वोत्कृष्ट मैत्री – लक्ष्मी आणि सिद्धू ( लक्ष्मी निवास )
झी मराठी पुरस्काराचे विजेते भाग – १
- सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुष – जगन्नाथ ( सावळ्याची जणू सावली )
- सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुष – विश्वा ( लक्ष्मी निवास )
- सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री – रेणुका ( लक्ष्मी निवास )
- फ्रेश फेस ऑफ द इयर – कमळी
- सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा स्त्री – जयंती ( सावळ्याची जणू सावली )
- सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा पुरुष – जित्या ( देवमाणूस )
- विशेष लक्षवेधी चेहरा – मीरा ( तुला जपणार आहे )
- रायझिंग स्टार ऑफ द इयर – जान्हवी ( लक्ष्मी निवास )
- सर्वोत्कष्ट भावंडं – वेंकी, भावना, जान्हवी ( लक्ष्मी निवास )
- सर्वोत्कृष्ट खलनायिका – कामिनी ( कमळी )
- सर्वोत्कृष्ट खलनायक – गोपाळ ( देवमाणूस )
- सर्वोत्कृष्ट मुलगी – पारू ( पारू )
- सर्वोत्कृष्ट मुलगा – आदित्य ( पारू )
- सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम – चला हवा येऊ द्या
- सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक – संकर्षण कऱ्हाडे ( आम्ही सारे खवय्ये ) अभिजीत खांडकेकर ( चला हवा येऊ द्या )
Zee 5 चे महत्त्वाचे पुरस्कार
- Zee 5 फेव्हरेट व्यक्तिरेखा पुरुष – जयंत ( लक्ष्मी निवास )
- Zee 5 फेव्हरेट व्यक्तिरेखा स्त्री – भावना ( लक्ष्मी निवास )
- Zee 5 वर सर्वाधिक पाहिलेली मालिका – सावळ्याची जणू सावली
- Zee 5 मोस्ट प्रॉमिसिंग शो – कमळी
- Zee 5 लोकप्रिय जोडी – सारंग-सावली ( सावळ्याची जणू सावली )
दरम्यान, सगळ्याच विजेत्या कलाकारांवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. याशिवाय काही कलाकारांनी पुरस्कार जिंकल्यावर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला आहे.
