Zee Marathi Awards 2026 Actress Look : कलाकारांचा गौरव करण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी ‘झी मराठी पुरस्कार’ सोहळा आयोजित केला जातो. नुकताच याचा नामांकन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला ‘झी मराठी’चे सगळे मुख्य कलाकार तसेच मालिकांमधील सहकलाकारही उपस्थित होते. रेड कार्पेटवर या सगळ्या कलाकारांचा प्रेक्षकांना मॉडर्न आणि नेहमीपेक्षा हटके अंदाज पाहायला मिळाला.
‘कमळी’च्या ऑनस्क्रीन आईची भूमिका लोकप्रिय अभिनेत्री योगिनी चौक साकारत आहे. मालिकेत योगिनीने गावी राहणाऱ्या, साध्याभोळ्या गौरीची भूमिका साकारली आहे. जी स्वत:ची ओळख बदलून, सर्वांपासून लपून राहत असते. त्यामुळे भूमिकेप्रमाणे योगिनी नेहमी सिंपल साडी, केस बांधलेले, मोठी टिकली या लूकमध्ये मालिकेत पाहायला मिळते. खऱ्या आयुष्यात मात्र, ही अभिनेत्री खूपच ग्लॅमरस आहे. झी मराठीच्या नामांकन सोहळ्याला तिने लाल रंगाचा स्लिव्हलेस वनपीस घालून एन्ट्री घेतली होती. तिचा हा ग्लॅमरस लूक पाहून चाहते थक्क झाले होते.

‘वीण दोघांतली ही तुटेना’मध्ये मल्लिका काकू कितीही ग्लॅमरस असली तरीही, ती नेहमी राजवाडेंच्या घरात साड्यांमध्ये वावरताना दिसते. पण, खऱ्या आयुष्यात ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री किशोरी अंबीये एकदम कूल अंदाजात रेड कार्पेटवर आल्या होत्या. त्यांना सर्वोत्कृष्ट खलनायिका म्हणून नामांकन मिळालं आहे.

‘सनई चौघडे’मधील जयची आई तेजस्विनी खानोलकर म्हणजेच अभिनेत्री अदिती सारंगधर सुद्धा ऑफ शोल्डर गाऊनमध्ये खूपच सुंदर दिसत होती. गळ्यात मॅचिंग नेकलेस, डिझायनर ऑफ शोल्डर गाऊन, केसांचा बन असा लूक अदितीने केला होता.

नामांकन सोहळ्यात केदार-तारिणीचा सुद्धा एकदम डॅशिंग अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळाला.

तर, लक्ष्मीची भूमिका साकारणाऱ्या हर्षदा खानविलकर यांचा ग्लॅमरस अंदाज पाहूनही चाहते थक्क झाले होते. याच मालिकेतील अभिनेत्री मीनाक्षी राठोड सुद्धा अगदी हटके लूक करून रेड कार्पेटवर पोहोचली होती.


दरम्यान, या सगळ्याच कलाकारांचे स्टायलिश लूक नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहेत.
