Zee Marathi Awards 2026 Full Winners List : ‘झी मराठी’ पुरस्कार सोहळ्यात यंदा ‘सनई चौघडे’ने बाजी मारत सर्वोत्कृष्ट मालिकेचा पुरस्कार पटकावला आहे. तसेच तेजश्री प्रधानच्या ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेने सर्वाधिक पुरस्कार जिंकल्याचं पाहायला मिळालं. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या दिमाखात हा सोहळा पार पडला. सिनेविश्वातील अनेक ज्येष्ठ कलाकार सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते.

‘झी मराठी पुरस्कार’ सोहळ्यात प्रेक्षकांना सर्व नायिकांचे, सर्व जोड्यांचे, वाहिनीवरील खलनायकांचे विशेष परफॉर्मन्स पाहायला मिळाले. याशिवाय श्रेया बुगडेने सादर केलेलं स्किट, अमेय वाघ आणि पुष्कराज चिरपुटकर यांच्या होस्टिंगने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. आता यावर्षी कोणकोणत्या कलाकारांनी बाजी मारत पुरस्कार जिंकलेत जाणून घेऊयात…

झी मराठी पुरस्कार सोहळ्यातील विजेत्यांची संपूर्ण यादी…

झी मराठी पुरस्कार विजेते भाग – २

  • सर्वोत्कृष्ट मालिका – सनई चौघडे
  • सर्वोत्कृष्ट कुटुंब – परब कुटुंब ( सनई चौघडे )
  • सर्वोत्कृष्ट नायक – समर राजवाडे ( वीण दोघांतली ही तुटेना )
  • सर्वोत्कृष्ट नायिका – शर्वरी ( सनई चौघडे )
  • सर्वोत्कृष्ट जोडी – जय-शर्वरी ( सनई चौघडे )
  • सर्वोत्कृष्ट मैत्री – समर, आनंद, निकिता ( वीण दोघांतली ही तुटेना )
  • सर्वोत्कृष्ट निसर्गप्रेमी व्यक्तिरेखा – स्वानंदी ( वीण दोघांतली ही तुटेना )
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुष – आनंद ( वीण दोघांतली ही तुटेना )
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्री – शारदा ( कृष्णाईच्या लेकी )
  • सर्वोत्कृष्ट आजी – समरची आजी ( वीण दोघांतली ही तुटेना )
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक खलनायिका – अधिरा ( कमळी )
  • सर्वोत्कृष्ट खलनायक – अंशुमन ( वीण दोघांतली ही तुटेना )
  • सर्वोत्कृष्ट खलनायिका – मल्लिका ( वीण दोघांतली ही तुटेना )
  • जीवनगौरव पुरस्कार – इला भाटे
  • सर्वोत्कृष्ट जावई – केदार ( तारिणी )
  • सर्वोत्कृष्ट सून – सावली ( सावळ्याची जणू सावली )
  • विशेष योगदान – पार्श्वसंगीत

झी मराठी पुरस्कार विजेते भाग – १

  • सर्वोत्कृष्ट बालकलाकार – अबीर, ओवी, शुभ्रा, आरव, इरा, रमा
  • वामन हरी पेठे ज्वेलर्स विशेष लक्षवेधी चेहरा – शर्वरी ( सनई चौघडे )
  • नॅचरल परफॉर्ममर ऑफ द इयर – कृष्णाई ( कृष्णाईच्या लेकी )
  • सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा – बबलू ( सावळ्याची जणू सावली )
  • सर्वोत्कृष्ट भावंडं – स्वानंदी-रोहन ( वीण दोघांतली ही तुटेना )
  • मातीतला माणूस पुरस्कार – कमळी ( कमळी मालिका )
  • सर्वोत्कृष्ट मुलगा – हृषी ( कमळी )
  • सर्वोत्कृष्ट मुलगी – स्वानंदी ( वीण दोघांतली ही तुटेना )
  • सर्वोत्कृष्ट वडील – सिद्धू ( लक्ष्मी निवास )
  • सर्वोत्कृष्ट आई – भावना ( लक्ष्मी निवास )
  • फ्रेश फेस ऑफ द इयर – शंकर, गौरी ( कृष्णाईच्या लेकी )
  • सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुष – रोहन ( वीण दोघांतली ही तुटेना )
  • सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री – अधिरा ( वीण दोघांतली ही तुटेना )
  • सर्वोत्कृष्ट नवरा – समर ( वीण दोघांतली ही तुटेना )
  • सर्वोत्कृष्ट निवेदक – मृण्मयी देशपांडे ( सारेगमप )
  • सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम – आम्ही सारे खवय्ये
  • सर्वोत्कृष्ट नायक Zee 5 मराठी – जय ( सनई चौघडे )
  • सर्वोत्कृष्ट नायिका Zee 5 मराठी – तारिणी ( तारिणी )
  • सर्वोत्कृष्ट जोडी Zee 5 मराठी – समर-स्वानंदी ( वीण दोघांतली ही तुटेना )
  • सर्वोत्कृष्ट मालिका Zee 5 मराठी – तारिणी

या सगळ्या विजेत्या कलाकारांवर प्रेक्षकांकडून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.