Zee Marathi Awards Part 1 Winners List : ‘झी मराठी पुरस्कार’ सोहळ्याचा पहिला भाग आज ( ३१ ऑक्टोबर ) टीव्हीसह Zee 5 वर प्रसारित करण्यात आला. लोकप्रिय अभिनेता अमेय वाघ आणि पुष्कराज चिरपुटकर यांनी या सोहळ्याचं सूत्रसंचालन केलं. या कार्यक्रमाला ‘झी मराठी’च्या विविध मालिकांमधील सगळे लोकप्रिय कलाकार, तसेच मराठी सिनेविश्वातील दिग्गज मान्यवरही उपस्थित होते. तारिणी-केदार अन् सुमी आजीचा सुंदर परफॉर्मन्स, शर्वरी आणि शायनर जयची जुगलबंदी, श्रेया बुगडेचं स्किट, सावली म्हणजे प्राप्ती रेडकरचं किक बॉक्सिंग टॅलेंट अशा बऱ्याच गोष्टी या सोहळ्याच्या पहिल्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळाल्या.

आता ‘झी मराठी’ पुरस्कार सोहळ्याच्या पहिल्या भागात कोणकोणत्या कलाकारांनी बाजी मारलीये जाणून घेऊयात…आदर्श नवऱ्याचा पुरस्कार यंदा समरची भूमिका साकारणाऱ्या सुबोध भावेने पटकावला आहे. तर, अभिनेत्री तेजश्री प्रधानला ‘सर्वोत्कृष्ट भावंडं’, ‘सर्वोत्कृष्ट मुलगी’, ‘Zee 5 मराठी सर्वोत्कृष्ट जोडी’ या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.

‘झी मराठी’ पुरस्कार विजेते – भाग १
( विजेत्यांची संपूर्ण यादी १ नोव्हेंबरला दुसरा भाग प्रसारित झाल्यावर जाहीर होईल )

  • सर्वोत्कृष्ट बालकलाकार – अबीर, ओवी, शुभ्रा, आरव, इरा, रमा
  • वामन हरी पेठे ज्वेलर्स विशेष लक्षवेधी चेहरा – शर्वरी ( सनई चौघडे )
  • नॅचरल परफॉर्ममर ऑफ द इयर – कृष्णाई ( कृष्णाईच्या लेकी )
  • सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा – बबलू ( सावळ्याची जणू सावली )
  • सर्वोत्कृष्ट भावंडं – स्वानंदी-रोहन ( वीण दोघांतली ही तुटेना )
  • मातीतला माणूस पुरस्कार – कमळी ( कमळी मालिका )
  • सर्वोत्कृष्ट मुलगा – हृषी ( कमळी )
  • सर्वोत्कृष्ट मुलगी – स्वानंदी ( वीण दोघांतली ही तुटेना )
  • सर्वोत्कृष्ट वडील – सिद्धू ( लक्ष्मी निवास )
  • सर्वोत्कृष्ट आई – भावना ( लक्ष्मी निवास )
  • फ्रेश फेस ऑफ द इयर – शंकर, गौरी ( कृष्णाईच्या लेकी )
  • सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुष – रोहन ( वीण दोघांतली ही तुटेना )
  • सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री – अधिरा ( वीण दोघांतली ही तुटेना )
  • सर्वोत्कृष्ट नवरा – समर ( वीण दोघांतली ही तुटेना )
  • सर्वोत्कृष्ट निवेदक – मृण्मयी देशपांडे ( सारेगमप )
  • सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम – आम्ही सारे खवय्ये
  • सर्वोत्कृष्ट नायक Zee 5 मराठी – जय ( सनई चौघडे )
  • सर्वोत्कृष्ट नायिका Zee 5 मराठी – तारिणी ( तारिणी )
  • सर्वोत्कृष्ट जोडी Zee 5 मराठी – समर-स्वानंदी ( वीण दोघांतली ही तुटेना )
  • सर्वोत्कृष्ट मालिका Zee 5 मराठी – तारिणी

‘तारिणी’ ही Zee 5 मराठीच्या कॅटेगरीत सर्वोत्कृष्ट मालिका ठरली आहे. टेलिव्हिजन विभागातील मुख्य पुरस्कार दुसऱ्या भागात म्हणजेच उद्या जाहीर केले जातील.