Zee Chitra Gaurav 2026 Awards Winners : मराठी मनोरंजनसृष्टीत मानाचा समजला जाणारा २०२६ चा ‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. काही दिवसांनी या सोहळ्याचं प्रक्षेपण टीव्हीवर केलं जाईल. मात्र, या पुरस्कार सोहळ्यात विजयी ठरलेल्या कलाकारांनी सोशल मीडियावर आधीच पोस्ट शेअर करत याबाबत चाहत्यांना हिंट दिली आहे.

यंदा सर्वोत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री हे महत्त्वाचे पुरस्कार कोणी जिंकले याबाबत प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर विजेत्यांची नावं आता समोर आलेली आहेत.

यावर्षी सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे शिवराज वायचळ दिग्दर्शित ‘आता थांबायचं नाय!’ या सिनेमाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं होतं. आशय कुलकर्णीने पोस्ट शेअर करत ‘आता थांबायचं नाय!’ सिनेमाने किती पुरस्कार जिंकले याबाबत माहिती दिली आहे.

‘या’ पुरस्कार विजेत्यांची नावं आली समोर…

  • सर्वोत्कृष्ट चित्रपट – आता थांबायचं नाय!
  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – शिवराज वायचळ ( आता थांबायचं नाय )
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता – भरत जाधव (आता थांबायचं नाय!) व दिलीप प्रभावळकर ( दशावतार )
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – अमृता सुभाष ( जारण )
  • सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता – सिद्धार्थ जाधव (आता थांबायचं नाय!)
  • सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री – अनिता दाते ( जारण )
  • सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता – समीर चौघुले ( गुलकंद )
  • सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री – ईशा डे ( गुलकंद )
  • Garnier Most Trusted Face Of The Year – रेणुका शहाणे ( उत्तर )
  • सर्वोत्कृष्ट कथा – क्षितीज पटवर्धन ( उत्तर )
  • सर्वोत्कृष्ट गीतकार – असेन मी ( उत्तर )
  • सर्वोत्कृष्ट पटकथा – ओंकार गोखले, शिवराज वायचळ ( आता थांबायचं नाय )
  • सर्वोत्कृष्ट संवाद – ओंकार गोखले, शिवराज वायचळ, अरविंद जगताप ( आता थांबायचं नाय )
  • सर्वोत्कृष्ट गीतकार – मनोद यादव ( आता थांबायचं नाय )
  • सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत – सौरभ भालेराव ( आता थांबायचं नाय )
zee chitra gaurav
‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळा

दरम्यान, विजेत्यांवर मराठी कलाविश्वातून कौतुकाचा व शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. आता अन्य विजेत्यांची नावं पुरस्कार सोहळ्याचं टीव्हीवर प्रसारण झाल्यावर स्पष्ट होतील. लवकरच प्रेक्षकांना हा पुरस्कार सोहळा ‘झी मराठी’ वाहिनीवर पाहता येईल.