Devmanus upcoming twist New Entry: ‘देवमाणूस-मधला अध्याय’ ही मालिका सध्या लोकप्रिय ठरत आहे. झी मराठी वाहिनीवरील या मालिकेत अनेक ट्विस्ट पाहायला मिळतात. गोपाळ व लाली यांच्यातील भांडण पाहायला मिळाले. पैशांसाठी त्यांच्यात भांडण झाले होते. लालीने माधुरी व आर्या यांना मारल्यानंतर त्यांच्याकडील पैसे घेऊन ते लपवले होते.

गोपाळ ते पैसे मागत होता, मात्र लालीने नकार दिल्यानंतर त्याने तिला किडनॅप केले. त्यानंतर तिला मारहाणही केली. गोपाळला चकवा देऊन लाली तिथून निसटली. त्यानंतर तिच्या खूनाचा आरोप गोपाळवर आला. गोपाळ तुरुंगात जावा, यासाठी लालीने लपूनछपून प्रयत्न केले. तिच्या योजनेप्रमाणे गोपाळ तुरुंगात गेलाही, मात्र, शेवटच्या क्षणी जेव्हा गोपाळला न्यायाधीश शिक्षा देत होते, त्यावेळी लाली सर्वांसमोर आली.

तिचा मित्र आणि प्रसिद्ध वकील युगंधरने तिला किडनॅप केले होते, असे सांगतिले. तसेच, युगंधरने तिचा कसा छळ केला, त्याच्यापासून वाचण्यासाठी तिने नाईलाजाने त्याच्यावर चाकूने वार केला. त्यानंतर लाली व गोपाळ पुन्हा घरात आले. गोपाळ व लालीचे सत्य अजूनही कोणासमोर आले नाही. आता मात्र मालिकेत नवीन एन्ट्री होणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे.

‘देवमाणूस-मधला अध्याय’मध्ये नवीन एन्ट्री

झी मराठी वाहिनीने देवमाणूस मालिकेचा नवीन प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की लाली व गोपाळ मंदिरात आले आहेत. ते देवासमोर हात जोडतात. तितक्या एक मुलगी येताना दिसते. तिने हिरव्या व गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. वेणी घातली आहे. तिचा चेहरा दिसत नाही. ती पाठमोरी दिसते. ती मंदिराच्या दिशने जात आहे. ती मंदिरात येताच गोपाळला तिची चाहूल लागते. तो डोळे उघडतो आणि पाठीमागे वळून बघतो. गोपाळला पाहताच ती मुलगी पळत येते आणि त्याला मीठी मारते. मात्र, तिला पाहून गोपाळला धक्का बसल्याचे त्याच्या चेहऱ्यावर दिसते. तर लाली आश्चर्याने पाहत असल्याचे दिसते. या व्हिडीओच्या शेवटी लिहिले आहे, “आता कुठे होत होतं देवमाणसाचं आयुष्य सिंपल(Simple)पण त्याच्या आयुष्यात येतेय…..” तसेच, हा व्हिडीओ शेअर करताना लिहिले, “त्याला तर लागली तिची चाहुल आणि तुम्हाला?”

नेटकरी म्हणाले…

आता या प्रोमोवर अनेकांनी कमेंट्स करत त्यांचा अंदाज वर्तवला आहे. एकाने लिहिले, “डिंपल परत आली”, दुसऱ्या एकाने लिहिले, “डिंपल आहे”, तर एकाने लिहिले, “अस्मिता”, एकाने लिहिले, “सावध व्हा. डिंपल परत येत आहे”, आणखी एकाने लिहिले, “वाह! डिंपल परत आली”, एकाने लिहिले, “मालिका भरकटत चालली होती, म्हणून डिंपलला आणलं”, आणखी एकाने लिहिले, “१०० टक्के डिंपल आहे”, एकाने लिहिले, “टीआरपी वाढेल”, अशा अनेक कमेंट्स लिहिल्या आहेत.

दरम्यान, आता नवीन एन्ट्री ज्या मुलीची झाली आहे ती डिंपलच आहे का, हे पाहणे महत्त्वाचे आहे. देवमाणूस या मालिकेत अभिनेत्री अस्मिता देशमुखने डिंपल ही भूमिका साकारली होती. डॉक्टर अजित कुमार व डिंपल यांनी एकत्र येत पैशाच्या लोभापायी अनेक खून केले असल्याचे पाहायला मिळाले होते. आता डिंपल आल्यामुळे मालिकेत नेमके कोणते ट्विस्ट येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.