झी मराठीवरील ‘जाऊ बाई गावात’ या शोची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. एक अफलातून संकल्पना असलेला हा नवीन रिअ‍ॅलिटी शो ४ डिसेंबरपासून सुरु झाला. श्रीमंत आणि शहरात वाढलेल्या मुली गावरान आयुष्य जगू शकणार का? हेच ‘जाऊ बाई गावात’ या शोमध्ये पाहायला मिळत आहे. आता या कार्यक्रमात अभिनेता देवदत्त नागेची एंट्री झाली आहे.

जाऊ बाई गावात या कार्यक्रमाने प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे. आता ‘जाऊ बाई गावात’ मध्ये एक धमाकेदार टास्क घेऊन नवा पाहुणा आला. या पाहुण्याचे नाव म्हणजे अभिनेता देवदत्त नागे येणार आहे. याचा एक प्रोमो नुकताच समोर आला आहे.
आणखी वाचा : “दोघांच्या घरातून ठळक विरोध…”, ‘अशी’ जमली शिवानी सुर्वे अन् अजिंक्यची जोडी; अभिनेत्री म्हणाली, “त्याचे बाबा…”

Hapus mango, problems before Hapus mango,
लहरी निसर्गाचा फटका, कर्नाटककडून स्पर्धा, कीडरोगाचा धोका… ‘कोकणचा राजा’ हापूस आंब्यासमोर आणखी किती संकटांची मालिका?
अनोखी इफ्तार मेजवानी; हिंदू महिलांकडून मुस्लिम महिलांसाठी गोड भेट
There are no sports events and cultural programs in Nagpur here is the reason
नागपुरात क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम नाही, जाणून घ्या कारण…
Eligibility in Zopu Yojana without human intervention
झोपु योजनेत यापुढे पात्रता मानवी हस्तक्षेपाशिवाय!

या प्रोमोच्या सुरुवातीला देवदत्त नागे हा घोड्यावर येतो. त्यानंतर आता कार्यक्रमात बैलगाडा शर्यत रंगणार आहे. यात कोणता स्पर्धक बाजी मारणार आहे, हे लवकरच समोर येणार आहे.

आणखी वाचा : “६ पानांचा अन् सलग ६ मिनिटांचा सीन”, ‘झिम्मा २’ चित्रपटाबद्दल हेमंत ढोमेचा खुलासा, म्हणाला, “मी लपून बसलो…”

त्याबरोबरच येत्या आठवड्याच्या शेवटी या कार्यक्रमाचे पहिलं एलिमिनेशन होणार आहे. त्यामुळे खेळातल्या पहिल्या आठवड्यातच कोणाचा प्रवास थांबणार हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.