Kamali Upcoming Twist: कमळी ही लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेत सतत काही ना काही ट्विस्ट पाहायला मिळतात. कमळी ही सिद्धटेकहून मुंबईला शिक्षण घेण्यासाठी आली आहे. तिला तिची स्वप्ने पूर्ण करायची आहे. गावातील मुलींसाठी काहीतरी करायचे आहे.
मुंबईत आल्यानंतर मात्र कमळीला अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे दिसत आहे. अगदी सुरुवातीपासूनच अनिकाने तिला त्रास द्यायला सुरुवात केली होती. कमळीला कॉलेजमध्ये प्रवेश मिळू नयेत, यासाठी तिने अनेक कारस्थाने केली. त्यासाठी तिने तिच्या आईची व आजी कामिनीची मदत घेतली. कामिनीनेदेखील कमळीला त्रास देण्यासाठी अनेक कारस्थाने केली.
पुढे राजनच्या सांगण्यावरुन कमळी महजनांच्या घरी राजनची मोठी मुलगी, अन्नपूर्णा आजीची मोठी नात म्हणून आली. हे सर्व अन्नपूर्णा आजीसाठी केले होते. मात्र, काही दिवसांपूर्वी कमळी अन्नपूर्णा आजीची खरी नात नसल्याचे समोर आले. त्यानंतर अन्नपूर्णा आजीने तिला घराबाहेर काढले. तिने विश्वासघात केल्याचे तिला सुनावण्यात आले.
अन्नपू्र्णा आजीने घराबाहेर काढल्यानंतर कमळीच्या आयुष्यातील अचडणी वाढल्याचे दिसत आहे. तिला कॉलेजमध्ये अनिका, कामिनी सतत त्रास देत असल्याचे पाहायला मिळत आहे. पण, तरीही कमळी तिची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी जिद्दीने उभी असल्याची पाहायला मिळत आहे. या सगळ्यात कमळीला ऋषी, निंगी व बंड्या खंबीरपणे साथ देत आहेत.
“परीक्षेचं वेळापत्रक पाहून तुझे…”
आता कमळी मालिकेचा एक प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, कमळी व अनिका एकमेकांना आव्हान देत आहेत. अनिका कमळीला म्हणते, “परीक्षेचं वेळापत्रक पाहून तुझे डोळे बटाट्यासारखे झाले आहेत?” त्यावर कमळी म्हणते, “माझ्या डोळ्यांचं जाऊ देत. तुझ्या डोक्यात बटाटे भरलेत त्याचं काय?”, त्यावर अनिका म्हणते, “हेच बटाटे तुला नाही विकायला लावले ना…”, त्यावर अनिका म्हणते, “ए चिवचिवाट, गावावरुन शिक्षणाची शपथ घेऊन काय उगाच इथे आले आहे का?”, त्यावर अनिका म्हणते, “कमळी, तू या परिक्षेत १०० टक्के नापास होणार.” त्यानंतर कमळी तिला म्हणते की आता मी परिक्षेत कसं टॉपमध्ये येते, ते बघच. शेवटी ती म्हणते, “आता वाजू दे बिगुल, हाण की बडीव, कोंबड्या उडीव.”
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “महापरीक्षेत कमळी निकाल लावणार की तिचाच निकाल लागणार?”, अशी कॅप्शन दिली आहे.
मालिकेत दाखविल्याप्रमाणे, अनिकाने याआधीही कमळीला कॉलेजमधून बाहेर काढावे, यासाठी अनेक कारस्थाने केली आहेत. तिला परिक्षेत कमी मार्क्स मिळावेत, यासाठीसुद्धा प्रयत्न केले आहेत. त्यामुळे मालिकेत नेमकं काय होणार, कमळी या आव्हानात यशस्वी होणार का, कि अनिकाची कारस्थाने तिच्यावर भारी पडणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
