Zee Marathi Serial : ‘झी मराठी’च्या लोकप्रिय मालिकेतून मुख्य अभिनेत्रीने एक्झिट घेतल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सुरू होत्या. यावर काहीही करून आमच्या लाडक्या अभिनेत्रीला पुन्हा मालिकेत घेऊन या…अशी विनंती गेल्या आठवड्याभरापासून चाहते कमेंट्स सेक्शनमध्ये करत होते. अखेर सर्वांची ती इच्छा पूर्ण झाली असून, मालिकेची मुख्य अभिनेत्री लवकरच शोमध्ये दमदार रिन्ट्री घेण्यास सज्ज झाली आहे. त्या अभिनेत्रीचं नाव आहे महिमा म्हात्रे. ‘झी मराठी’च्या ‘तुला जपणार आहे’ या मालिकेत ती ‘मीरा’ हे पात्र साकारत आहे.
मीराची भूमिका साकारणारी महिमा म्हात्रे गेल्या काही दिवसांपासून चाहत्यांना मालिकेत झळकताना दिसली नव्हती. त्यामुळे तिच्या पोस्टवर कमेंट्स करत नेटकऱ्यांनी “तू मालिका सोडलीस का?”, “शोमध्ये पुन्हा केव्हा परतणार” असे असंख्य प्रश्न तिला विचारले होते. यावर ‘झी मराठी’ने किंवा महिमाने कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती.
अखेर महिमाची मालिकेत रिएन्ट्री झाल्याचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांसमोर आला आहे. “प्रेमाचा अश्वमेध चौफेर उधळणार.. ती त्याच्यासाठी परत येणार!” असं कॅप्शन देत हा प्रोमो ‘झी मराठी’वर शेअर करण्यात आला आहे.
‘तुला जपणार आहे’ या मालिकेत अथर्व आणि मीरा आता एकमेकांना प्रेमाची कबुली देखील देणार आहे. अथर्व सर्वत्र मीराचा शोध घेत असतो. यावेळी काही गुंड तिचा पाठलाग करत असतात असं प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. या गुंडांनी झाडलेली गोळी मीराला नव्हे तर अथर्वला लागते. यामुळे मीरा भयंकर पॅनिक होते. याचदरम्यान अथर्व प्रेम व्यक्त करताना म्हणतो, “मीरा आय लव्ह यू!” यानंतर मीरा नवऱ्याचा जीव वाचवण्यासाठी त्याला उपचारासाठी घेऊन जाते.
दरम्यान, ‘तुला जपणार आहे’ मालिकेत हा जबरदस्त ट्विस्ट ११ डिसेंबरला पाहायला मिळेल. ही मालिका रात्री साडेदहा वाजता ‘झी मराठी’ वाहिनीवर प्रसारित केली जाते.
