Zee Marathi New Serial : 'झी मराठी' वाहिनीवर अजूनही नव्या मालिकांचं सत्र सुरू आहे. ‘शिवा’, ‘पारू’, 'पुन्हा कर्तव्य आहे', 'नवरी मिळे हिटलरला', ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकांनंतर आता आणखी एक नवी मालिका प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाली आहे. 'सावळ्याची जणू सावळी' असं नव्या मालिकेचं नाव आहे. काही दिवसांपूर्वी या नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आता मालिकेचा एक जबरदस्त प्रोमो प्रदर्शित झाला असून यामधून मालिकेतील प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचा खुलासा झाला आहे. महेश कोठारे व आदिनाथ कोठारे यांची निर्मिती असलेली ‘सावळ्याची जणू सावली’ नव्या मालिकेचा नवा प्रोमो नुकताच 'झी मराठी'च्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. काखेत हंडा घेऊन पाणी भरण्यासाठी नदीवर आलेल्या एका मुलीच्या एन्ट्रीने प्रोमोची सुरुवात होत आहे. एक महिला मुलीला पाहून म्हणते की, आली आमच्या पांडुरंगाची सावली. त्यानंतर ती सावळीशी मुलगी नदीतून पाण्याने हंडा भरते आणि भरलेला हंडा घेऊन गात जाताना दिसत आहे. यावेळी नदीवर कपडे धुवायला आलेल्या महिला तिचं कौतुक करताना पाहायला मिळत आहेत. तिच्या गोड आवाजाने गावातले सर्वजण मंत्रमुग्ध होताना दिसत आहेत. पण यावेळी एक आजोबा म्हणतात की, एवढा गोड आवाज आहे. एवढी दिसलाय पण गोड असती तर. त्यानंतर केसात गजरा माळलेली ती सावळीशी मुलगी पांडुरंगाची भक्ती भावाने पूजा करताना पाहायला मिळत आहे. याच सावलीचे सूर सौंदर्याची व्याख्या बदलणार का? हे 'झी मराठी'च्या नव्या मालिकेत ( Zee Marathi New Serial ) पाहायला मिळणार आहे. हेही वाचा - Video: “जा बुड, मर त्या पाण्यात…”, अमृता खानविलकर चिडली संकर्षण कऱ्हाडेवर, नेमकं काय घडलं? पाहा Zee Marathi New Serial ‘सावळ्याची जणू सावली’ नव्या मालिकेत प्रमुख भूमिकेत अभिनेत्री प्राप्ती रेडकर झळकणार आहे. याआधी 'कलर्स मराठी'च्या 'काव्यांजली' मालिकेत प्राप्तीने काम केलं होतं. या मालिकेतील तिची अंजली ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली होती. त्यानंतर आता या नव्या मालिकेतून प्राप्ती पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी येत आहे. हेही वाचा – Video: “तोंड शिवलं होतं का?” धनंजय आणि घनःश्याममध्ये पडली वादाची ठिणगी, नेटकरी म्हणाले, “कोल्हापुरी दणका…” 'झी मराठी' वाहिनीवरील ‘सावळ्याची जणू सावली’ नवी मालिका ( Zee Marathi New Serial ) कधीपासून सुरू होणार? हे अद्याप जाहीर झालेलं नाही. पण या मालिकेचा जबरदस्त प्रोमो पाहून प्रेक्षकांमधील उत्सुकता वाढली आहे. तसंच पुन्हा एकदा प्राप्तीला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी तिचे चाहते देखील आतुरतेने वाढ पाहत आहेत.