‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘जाऊ बाई गावात’ हा आगळा वेगळा कार्यक्रम चांगलाच गाजला. त्यामुळे आता आणखी एक नवा कार्यक्रम ‘झी मराठी’ प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. ‘ड्रामा ज्युनिअर्स’ असं नव्या कार्यक्रमाचं नाव असून यामध्ये लहान मुलांचा बहुरंगी अभिनय पाहता येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘ड्रामा ज्युनिअर्स’ कार्यक्रमाचे दोन प्रोमो आले. ज्यामधून परीक्षक आणि सूत्रसंचालन कोण करणार याचा खुलासा झाला. त्यानंतर आता ‘ड्रामा ज्युनिअर्स’ कार्यक्रम कधीपासून सुरू होणार? हे समोर आलं आहे.

मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचे कलाकार अभिनेता संकर्षण कऱ्हाडे व अभिनेत्री अमृता खानविलकर ‘ड्रामा ज्युनिअर्स’ कार्यक्रमाचे परीक्षक असणार आहेत. तसंच महत्त्वाचं म्हणजे ‘ड्रामा ज्युनिअर्स’च्या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी ‘झी मराठी’च्या जुन्या व लोकप्रिय कलाकाराकडे देण्यात आली आहे. ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री श्रेया बुगडे ‘ड्रामा ज्युनिअर्स’ कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे. काही दिवसांपूर्वी याचा जबरदस्त प्रोमो समोर आला होता. त्यामुळे ‘झी मराठी’चा हा नवा कार्यक्रम कधीपासून सुरू होणार? याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये होती.

हेही वाचा – Video: “आनंदी कुठे गेली?”, ‘मन धागा धागा जोडते नवा’चा प्रोमो पाहून प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया, मालिका घेणार ६ वर्षांचा लीप

अखेर मुहूर्त ठरला आहे. संकर्षण कऱ्हाडे व अमृता खानविलकर परीक्षक असणारा ‘ड्रामा ज्युनिअर्स’ कार्यक्रम २२ जूनपासून शनिवार-रविवार रात्री ९ वाजता प्रसारित होणार आहे. त्यामुळे आता सध्या यावेळेत सुरू असलेली ‘शिवा’ मालिका फक्त सोमवार ते शुक्रवार दाखवण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – शरद पवार आणि ‘झपाटलेला’ चित्रपटाचं आहे खास कनेक्शन, महेश कोठारेंनी सांगितला ‘तो’ किस्सा

हेही वाचा – रोहित शेट्टीला ‘या’ स्पर्धकामध्ये दिसतोय ‘खतरों के खिलाडी १४’चा विजेता, कौतुक करत म्हणाला…

दरम्यान, ‘झी मराठी’च्या ‘ड्रामा ज्युनिअर्स’ कार्यक्रमानंतर आणखी एक नवी मालिका सुरू आहे. अभिनेता नितीश चव्हाण व अभिनेत्री दिशा परदेशीची मुख्य भूमिका असलेली ‘लाखात एक आमचा दादा’ मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेत नितीश व दिशा व्यतिरिक्त अभिनेत्री कोमल मोरे, समुद्धी साळवी, इशा, जुई तनपुरे या सूर्यादादाच्या बहिणी म्हणून झळकणार आहेत. पण अद्याप या नव्या मालिकेची वेळ जाहीर करण्यात आलेली नाही.