Zee Marathi Actress : ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत गेल्या काही दिवसांपासून लीप आल्याचं पाहायला मिळत आहे. मेहेंदळे कुटुंबीयांपासून दूर…सावलीचा वेगळा प्रवास सुरू झालेला आहे. सावलीला जुळी मुलं होतात. तिच्या मुलीचं नाव आहे ओवी आणि मुलाचं नाव आहे अबीर. सावलीची ही मुख्य भूमिका अभिनेत्री प्राप्ती रेडकर साकारत आहे. खऱ्या आयुष्यात प्राप्ती फक्त २२ वर्षांची आहे. कमी वयातही प्राप्ती अगदी छान पद्धतीने ऑनस्क्रीन आईची भूमिका साकारताना दिसतेय.
प्राप्तीचं ओवी आणि अबीरची भूमिका साकारणाऱ्या साईराज केंद्रे आणि वेदांती भोसलेबरोबर सुद्धा खूप छान बॉण्डिंग झालेलं आहे. या तिघांच्या एका Cute व्हिडीओने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
साईराज आणि वेदांती हे दोघंही प्राप्तीचा मेकअप करत असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. साईराज प्राप्तीला पावडर लावतोय, दुसरीकडे वेदांती तिची हेअरस्टाइल करताना दिसतेय. शेवटी हे दोघंही चिमुकले प्राप्तीचा Eye मेकअप करतात. प्राप्ती सुद्धा अगदी आवडीने या दोघांकडून मेकअप करून घेतेय. यावरून या तिघांचं अल्पावधीतच किती छान बॉण्डिंग जमलंय हे पाहायला मिळतंय. अभिनेत्रीने या व्हिडीओला “मुले ही देवाघरची फुले” असं कॅप्शन दिलं आहे.
प्राप्तीने शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी सुद्धा कौतुकाचा वर्षाव केला आहे. “ऑफस्क्रीन बॉण्डिंग कमाल जमलंय”, “ही मुलं खरंच खूप गोड आहेत आणि सावली एन्जॉय करतेय मस्त व्हिडीओ”, “खूपच गोड बॉण्डिंग आहे”, “Cuties इन वन फ्रेम” अशा प्रतिक्रिया या व्हिडीओवर आल्या आहेत.
दरम्यान, ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत लोकप्रिय बालकलाकार साईराज केंद्रे आणि वेदांती भोसले यांची काही दिवसांपूर्वीच एन्ट्री झाली. साईराज “आमच्या पप्पांनी गणपती आणला” या गाण्यामुळे प्रचंड लोकप्रिय झाला होता. याशिवाय याआधी त्याने ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. तर, वेदांती ‘ड्रामा ज्युनिअर्स’ या शोमुळे घराघरांत लोकप्रिय झाली.
‘सावळ्याची जणू सावली’ ही मालिका आता लीपनंतर १३ एप्रिलपासून दुपारी १ वाजता ‘झी मराठी’ वाहिनीवर प्रसारित केली जाते.
