Savlyachi Janu Savali upcoming twist: ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत सतत काही ना काही ट्विस्ट पाहायला मिळतात. या मालिकेत सध्या सावली व सारंग यांच्यातील दुरावा आला आहे.

सावली तिच्या मुलासह अबीरसह मेहेंदळे कुटुंबापासून दूर राहत आहे. तर, सारंग मुलगी ओवीसह मेहेंदळे कुटुंबात राहत आहे. राजकुमार कुटुंबियांची फसवणूक करत असल्याचे पाहायला मिळत आहे. राजकुमार, भैरवी व तिलोत्तमा यांच्यामुळे सावली व सारंग यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे. नुकतीच अनेक दिवसांनी जगन्नाथ व सावलीची भेट झाल्याचे पाहायला मिळाले. आता मालिकेत आणखी एक ट्विस्ट येणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत ट्विस्ट

झी मराठी वाहिनीने सावळ्याची जणू सावली मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोममध्ये पाहायला मिळते की, मोनिका ओवीला ओरडते. तिची बाहुली खाली फेकत तिला म्हणते की शुभ्राला रडवण्याची हिंमत कशी केलीस तू? ओवी तिला म्हणते की बाबा रागवेल. त्यावेळी तिला शांत बसायला सांगते. तसेच, हातात चाकू घेत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर सारंग ओवीला काय होतंय असे विचारत असताना ओवी घाबरून मोठ्याने ओरडत असल्याचे पाहायला मिळते.

प्रोमोमध्ये पुढे दिसते, सावलीच्या घरी काही महिला आल्या आहेत. त्यातील एकजण सावलीला म्हणते, “मी तुमची खूप मोठी चाहती आहे.” तिचे ते बोलणे ऐकून अबीर विचारतो की माझी आई हिरॉईन आहे का? त्यावर ती महिला म्हणते, “तुझी आई एकेकाळी प्रसिद्ध गायिका होती.”

आता हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “सावलीला तिची ओळख व कुटुंब नव्याने मिळणार का?”, अशी कॅप्शन दिली आहे.

सावली ही उत्तम गायिका आहे. भैरवी वझेमुळे अनेक वर्षे तिला तिची ओळख लपवावी लागली. मात्र, सारंगने सावलीच्या आवाजाचे सत्य संपूर्ण जगासमोर आणले. सारंगने प्रत्येकवेळी सावलीचे रक्षण केले, सर्वांच्या विरोधात जाऊन सावलीच्या बाजूने खंबीरपणे उभा राहिला. मात्र, शेवटी गैरसमजांमुळे त्यांच्यात दुरावा आला. आता ते पुन्हा कधी भेटणार, अबीर व ओवी त्याची मुले असल्याचे सत्य त्याला कधी समजणार, मेहेंदळे कुटुंबात सावली कधी परतणार, मालिकेत नेमकं काय घडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.