scorecardresearch

Premium

Video: ‘दार उघड बये’ ७ ऑक्टोबरला प्रेक्षकांचा घेणार निरोप; शूटिंगच्या शेवटच्या दिवसातील काही खास क्षण पाहा

‘दार उघड बये’ मालिकेतील कलाकारांनी शूटचा शेवटचा दिवस असा केला साजरा

zee marathi serial Daar Ughad Baye
'दार उघड बये' मालिकेतील कलाकारांनी शूटचा शेवटचा दिवस असा केला साजरा

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘दार उघड बये’ आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. १९ सप्टेंबरला २०२२ला सुरू झालेल्या या मालिकेनं अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली. मुक्ता आणि सारंगची जोडी प्रेक्षकांना आवडू लागली. पण आता मालिका शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात ‘दार उघड बये’ मालिका ऑफ एअर होणार आहे.

हेही वाचा – Bigg Boss 17: ‘खतरों के खिलाडी १२’नंतर तू ‘बिग बॉस १७’मध्ये झळकणार का?, चाहत्यांच्या प्रश्नावर फैसल शेख म्हणाला…

aboli
Video: “एक व्हीलचेअरवर बसलेली मुलगी…,” ‘अबोली’ मालिकेचा नवा प्रोमो पाहून नेटकरी हैराण, म्हणाले…
shubham borade
‘ढोलकीच्या तालावर’च्या निकालावर प्रेक्षक नाराज; म्हणाले, “शुभम बोराडेचं विजेता…”
Google CEO Sundar Pichai has shared photos of how they celebrated Google's 25th birthday
सेलिब्रेशनशिवाय वाढदिवस अपूर्ण! सुंदर पिचाई यांनी गुगलच्या वाढदिवसाचे शेअर केले खास क्षण…
The Vaccine War box office collection day 1
नाना पाटेकर यांच्या ‘द व्हॅक्सिन वॉर’कडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ, पहिल्या दिवसाची कमाई निराशाजनक, वाचा आकडे

‘दार उघड बये’ मालिकेत मुक्ता ही प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री सानिया चौधरीनं नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिनं मालिकेच्या शूटच्या शेवटच्या दिवसाचे काही खास क्षण दाखवले आहेत. ज्यामध्ये सर्व कलाकार मंडळी शेवटचा दिवस असला तरी तितक्याच जोमाने कामाबरोबर मज्जा-मस्ती करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत सानियाने लिहीलं आहे की, “प्रेम, हास्य अन् अविस्मरणीय आठवणींनी भरलेलं वर्ष. या मालिकेसाठी आणि ऑफस्क्रीन कुटुंबासाठी अत्यंत कृतज्ञ आहे. आमच्या शूटच्या शेवटच्या दिवसातील काही क्षण.…. ‘दार उघड बये’ पाहत राहा दुपारी २ वाजता”

हेही वाचा – Video: लहान मुलगा बोबड्या बोलात म्हणाला ‘ऐश्वल्या लाय’, अभिनेत्रीने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया, व्हिडीओ व्हायरल

आतापर्यंत ‘दार उघड बये’ या मालिकेचे ३०० हून अधिक भाग प्रसारित झाले आहेत. ७ ऑक्टोबरला मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. या मालिकेत सानिया व्यतिरिक्त रोशन विचारे, शरद पोंक्षे, किशोरी अबिये महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

हेही वाचा – “तू हिंदी चित्रपट, सीरिजमध्ये काम का करत नाहीस?” हेमांगी कवीने समीर चौघुलेंचा व्हिडीओ शेअर करत दिलं उत्तर…

दरम्यान, या मालिकेतील रोशन विचारे आता नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘सोनी मराठी’वरील नवी मालिका ‘खरंच तिचं काय चुकलं?’ यामध्ये रोशन मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तसेच या मालिकेत अभिनेत्री भाग्यश्री दळवी देखील पाहायला मिळणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Zee marathi serial daar ughad baye last day shoot video pps

First published on: 30-09-2023 at 20:06 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×