‘झी मराठी पुरस्कार सोहळा २०२६’ नुकताच मोठ्या दिमाखात पार पडला. या सोहळ्याला वाहिनीवरील सगळ्या लोकप्रिय कलाकारांनी यंदाच्या थीमनुसार इंडो-वेस्टर्न लूकमध्ये उपस्थिती लावली होती. मात्र, या सगळ्यात एका खास जोडीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आणि ती जोडी म्हणजे अभिनेत्री शिवानी मुंढेकर आणि अभिनेता अजिंक्य ननावरे.

खरंतर, शिवानी मुंढेकर आणि अजिंक्य हे दोघं सध्या सुरू असलेल्या ‘झी मराठी’च्या कोणत्याही मालिकेचे सदस्य नाहीत, त्यामुळे हे दोघं पुरस्कार सोहळ्याला का आले होते असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात उपस्थित झाला होता.

अखेर समोर आलेल्या माहितीनुसार, शिवानी मुंढेकर ही ‘झी मराठी’ची नवीन नागीण असणार आहे. तर, याच मालिकेत अजिंक्य ननावरे सुद्धा प्रमुख भूमिका साकारणार आहे.

शिवानीने यापूर्वी ‘स्टार प्रवाह’च्या गाजलेल्या ‘मुरांबा’ मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. ‘मुरांबा’ने १४०० भाग पूर्ण झाल्यावर प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. आता प्रेक्षकांची लाडकी शिवानी पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘झी मराठी’वर तिची ही पहिलीच मालिका असणार आहे.

shivani & Ajinkya
शिवानी आणि अजिंक्य

तर, अजिंक्य ननावरेने यापूर्वी सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. अलीकडेच तो ‘तुझ्या सोबतीने’ मालिकेतही झळकला. आता अजिंक्य नागीणमधून झी मराठीवर पुनरागमन करणार आहे.