scorecardresearch

विलेपार्लेच्या चाळीत राहते ‘चला हवा येऊ द्या’मधील प्रसिद्ध अभिनेत्री, म्हणाली, “आई दुसऱ्यांच्या घरी जेवण बनवायचं करायची काम अन्…”

चाळीत राहते ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमातील प्रसिद्ध अभिनेत्री, सांगितला खडतर प्रवास

chala hava yeudya actor snehal shidam
चाळीत राहते 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमातील प्रसिद्ध अभिनेत्री, सांगितला खडतर प्रवास

आपल्या लाडक्या कलाकारांचं खासगी आयुष्य जाणून घेण्यात चाहत्यांना अधिक रस असतो. कलाकारांचं लाइफस्टाइल, त्यांचं घर सारं काही कलाक्षेत्रामध्ये चर्चेचा विषय ठरत असतं. आज अशाच एका अभिनेत्रीच्या लाइफस्टाइलबाबत आपण जाणून घेणार आहोत. झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाता काम करणारी अभिनेत्री स्नेहल शिदम हिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिच्या खासगी आयुष्याबाबत खुलासा केला आहे.

आणखी वाचा – Video : ‘पठाण’मधील ‘तो’ सीन सुरू असतानाच इंडोनेशियाच्या थिएटरमध्ये प्रेक्षकांनी स्क्रिनकडे घेतली धाव; घडलं असं काही की…

‘इट्स मज्जा डॉटकॉम’ या युट्युब चॅनला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्नेहलने तिच्या घराची गोष्ट सांगितली. स्नेहल विलेपार्ले येथील चाळीत राहते. या चाळीमध्येच तिचं छोटसं घर आहे. काही वर्ष भाड्याच्या घरात राहिल्यानंतर स्नेहलच्या आई-वडिलांनी विलेपार्लेच्या चाळीमध्येच घर खरेदी केलं. आधी छोटसं झोपडं होतं. त्यानंतर घराचं बांधकाम करुन घेतलं असं यावेळी स्नेहलने सांगितलं.

स्नेहल डान्स शो करत असतानाचा तिने एक किस्सा सांगितला. स्नेहल म्हणाली, “मी डान्स शो करत असताना आम्ही घरातले अशाच एका कार्यक्रमाला गेलो होतो. चाळ म्हटल्यावर उंदिर आलेच. घरात जेवण बनवून आम्ही बाहेर पडलो होतो. जेव्हा आम्ही कार्यक्रम संपल्यानंतर घरी आलो तेव्हा जेवणाची नासाडी झाली होती. तेव्हा माझ्या वडिलांनी असा निर्णय घेतला की, आज मुलांच्या पुढ्यातलं अन्न गेलं आहे हे परत कधीच घडू नये. म्हणून त्यांनी घर बांधलं.”

आणखी वाचा – ‘तू चाल पुढं’मध्ये काम करणाऱ्या अंकुश चौधरीच्या बायकोचं शिक्षण किती? स्वतःच खुलासा करत म्हणाली…

शिवाय स्नेहलची आई दुसऱ्यांच्या घरी जेवण बनवण्याचं काम करायची. पण हे तिने कधीच लपवून ठेवलं नाही. शिवाय चाळीत राहत असल्याची स्नेहला कोणत्याच प्रकारची लाज वाटत नाही. हे तिने स्वतःच या मुलाखतीमध्ये स्पष्ट शब्दांमध्ये सांगितलं. स्नेहल ‘चला हवा येऊ द्या ‘च्या ‘होऊ द्या व्हायरल’ या पर्वाची विजेती होती. किर्ती कॉलेजमध्ये तिचं शिक्षण झालं. शिवाय ‘स्वीटी सातारकर’ या चित्रपटामधून तिने मोठ्या पडद्यावरही पदार्पण केलं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 16:23 IST