Tarini fame Actors Dance Video Viral: मालिकांमधील पात्रे हळूहळू आपल्या दररोजच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग बनतात. त्यामुळे आपल्या आवडत्या मालिकेत काय घडणार, आपल्या आवडत्या पात्राच्या आयुष्यात पुढे काय घडणार, हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. मालिकेत विविध नाती, आयुष्यातील गुंतागंत अशा अनेक गोष्टी पाहायला मिळतात. पडद्यावर ही पात्रे अनेकदा भांडताना दिसतात, काही पात्रे इतरांविरुद्ध कट कारस्थाने करताना दिसतात. मात्र, खऱ्या आयुष्यात मात्र या कलाकारांमध्ये चांगली मैत्री, उत्तम बॉण्डिंग असल्याचे दिसते. सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकाल विविध रील्स, व्हिडीओ शेअर करत असतात.
झी मराठी वाहिनीवरील तारिणी ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेची गोष्ट, मांडणी, त्यातील पात्रे सर्वच लक्ष वेधून घेतातात. तारिणी, केदार, कौशिकी, युवराज, निशिता, सुमी आजी, दयानंद खांडेकर, गुलाब, तारिणीची संपू्र्ण टीम याबरोबरच काही दिवसांपूर्वी मालिकेतील आलेली रेवा आणि सगळीच पात्रे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असल्याचे दिसत आहे.
केदार व तारिणी हे स्पेशल क्राइम युनिटचा भाग आहेत. मात्र, ते या युनिटचा भाग आहेत, हे त्याच्या टीमव्यतिरिक्त कोणालाही माहित नाही. त्यामुळे ते एनजीओमध्ये काम करतात, हेच सगळ्यांना माहित आहे. गेल्या काही दिवसांपासून केदार त्याच्या बहिणीच्या एमएनएन या न्यूज चॅनेलमध्ये काम करत आहे.
कौशिकी, केदार व तारिणी यांच्यात ऑनस्क्रीन उत्तम बॉण्डिंग असल्याचे पाहायला मिळते. जसे त्यांच्यात ऑनस्क्रीन बॉण्डिंग चांगले आहे. तसेच, त्यांच्यात ऑफस्क्रीन बॉण्डिंगही चांगले असल्याचे दिसते. कलाकार विविध फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात.
अभिज्ञा भावे व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “प्रत्येक तास…”
कौशिकी ही भूमिका अभिनेत्री अभिज्ञा भावेने साकारली आहे. केदार ही भूमिका स्वराज नागरगोजने साकारली आहे. तर तारिणी ही भूमिका अभिनेत्री शिवानी सोनारने साकारली आहे. आता अभिज्ञाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिच्याबरोबर स्वराज व शिवानीदेखील दिसत आहेत. ते मिका सिंगच्या Happy Hour या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. सुरुवातीला ते दु:खी दिसत आहेत. त्यानंतर त्यांचे ट्रान्सफॉर्मेशन पाहायला मिळत आहे. त्यांनी सुंदर कपडे परिधान केल्याचे दिसत आहे.
हा व्हिडीओ शेअर करताना अभिज्ञाने लिहिले, “प्रत्येक तास आनंदी असणे गरजेचे आहे.” अभिज्ञाने शेअर केलेल्या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स करत सर्वांचे कौतुक केले आहे.तसेच, त्यांच्यामुळे मालिका पाहाविशी वाटते, असेही काहींनी लिहिले आहे.
दरम्यान, मालिकेत पुढे काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
