Zee Marathi Awards 2026 Tejashri Pradhan Award List : ‘झी मराठी’ पुरस्कार सोहळा नुकताच मोठ्या दणक्यात पार पडला. यंदा या सोहळ्यात तेजश्री प्रधान प्रमुख भूमिकेत असलेल्या ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेने बाजी मारली. तेजश्रीच्या मालिकेने सर्वाधिक पुरस्कार जिंकत तब्बल १३ अवॉर्ड्सवर आपलं नाव कोरलं आहे. या १३ पैकी चार पुरस्कार तेजश्रीने जिंकले आहेत. पुरस्कार जिंकताच अभिनेत्रीने खास पोस्ट शेअर करत सर्वांचे आभार मानले आहेत.

‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेने तब्बल १३ आणि ‘सनई चौघडे’ मालिकेने एकूण सहा पुरस्कार जिंकले आहेत. तेजश्री प्रधानला यावेळी ‘सर्वोत्कृष्ट निसर्गप्रेमी व्यक्तिरेखा’ या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

तेजश्रीला स्वानंदीच्या भूमिकेसाठी मिळालेले पुरस्कार खालीलप्रमाणे…

सर्वोत्कृष्ट निसर्गप्रेमी व्यक्तिरेखा – स्वानंदी ( वीण दोघांतली ही तुटेना )
सर्वोत्कृष्ट मुलगी – स्वानंदी ( वीण दोघांतली ही तुटेना )
सर्वोत्कृष्ट भावंडं – स्वानंदी-रोहन ( वीण दोघांतली ही तुटेना )
सर्वोत्कृष्ट जोडी Zee 5 मराठी – समर-स्वानंदी ( वीण दोघांतली ही तुटेना )

तेजश्री प्रधान म्हणते, “खूप खूप आभार…हा पुरस्कार मी माझ्या सगळ्या प्रेमळ चाहत्यांना डेडिकेट करते. तुमचा माझ्यावर असलेला विश्वासच खूप काही आहे आणि म्हणूनच हा पुरस्कार सुद्धा तुमचा आहे. थँक्यू झी मराठी, आमच्या मालिकेची संपूर्ण टीम, निर्माते, दिग्दर्शक…तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलात. असंच छान काम करत राहुयात.”

दरम्यान, ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिका रोज संध्याकाळी ७:३० वाजता झी मराठीवर प्रसारित केली जाते.