Veen Doghatli Hi Tutena Upcoming Twist: ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत लवकरच अधिरा व रोहन आणि स्वानंदी व समर लग्नबंधनात अडकणार आहेत. आता हा शाही विवाहसोहळा गोव्यात पार पडणार आहे.

या मालिकेत काही दिवसांपासून या दोन जोड्यांच्या लग्नाची तयारी सुरू आहे. लग्नाआधीचे कार्यक्रम पार पडत आहेत. आजी, स्वानंदीचे कुटुंबीय, समरचे मित्र आणि मैत्रीण सर्व जण आनंदात असले तरी समरच्या मल्लिका काकूला मात्र हे लग्न होऊ द्यायचे नाहीये, त्यासाठी ती सतत काही ना काही कारस्थान करताना दिसते.

हळदीच्या कार्यक्रमात सुश्मिता नशेत येणार अन्…

आता वीण दोघांतली ही तुटेनाचा एक प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या प्रोमोमध्ये रोहन व अधिरा आणि स्वानंदी व समर यांना हळद लागणार असल्याचे पाहायला मिळत आहे.

Award Banner

या प्रोमोमध्ये सुरुवातीला गोव्याचे दर्शन घडते. हळदीच्या कार्यक्रमाची तयारी पाहायला मिळते. समर, अधिरा, रोहन, स्वानंदी यांचे मोठ्या थाटामाटात स्वागत केले जाते. समरची मैत्रीण त्याला डान्स करायला भाग पाडते. समर आणि स्वानंदी डान्स करत असल्याचे प्रोमोमध्ये पाहायला मिळते. त्यानंतर सर्व जण त्यांना हळद लावत असल्याचेदेखील पाहायला मिळत आहे. सर्व जण आनंदी असल्याचे दिसत आहे.

या सगळ्यात ट्विस्ट येणार असल्याचे पुढे पाहायला मिळते. स्वानंदीची लहान बहीण सुश्मिता नशेत कार्यक्रमाच्या ठिकाणी येते. ती कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसते. तिला सांभाळण्यासाठी समर व स्वानंदी तिच्या पाठीमागे जातात. या सगळ्यात स्वानंदी व समर पाण्यात पडतात.

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “समर स्वानंदीला हळद लागणार, डेस्टिनेशन वेडिंग स्पेशल होणार…!”, अशी कॅप्शन दिली आहे.

नेटकरी म्हणाले…

हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. काहींनी परफेक्ट प्रोमो असे म्हटले आहे तर काहींनी हा प्रोमो सुंदर असल्याचे मत व्यक्त केले आहे. अनेकांनी हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत.

एकाने लिहिले, “शेवटी समर आणि स्वानंदी एकत्र आले. आम्हाला असे एपिसोड पाहायचे आहेत”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “पिंट्या दादाने थोडं आणखी हसलं पाहिजे”, आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “पिंट्या दादा ही हसण्याची वेळ आहे, नखरे दाखवणे बंद कर”; एका नेटकऱ्याने लिहिले, “आता मजा आली”, दुसऱ्या एकाने लिहिले, “पिंट्या दादा आणि नंदू ताईचे लग्न”, एकाने लिहिले, “हे डेस्टिनेशन वेडिंग पाहण्यासाठी उत्सुक आहे.”

दरम्यान, आता मालिकेत आणखी काय गमतीजमती घडणार, काय होणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.