Zee Natya Gaurav 2026 Full Winner List : मराठी रंगभूमीचा सर्वात प्रतिष्ठित मानला जाणारा ‘झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळा २०२६’ नुकताच पार पडला आहे. रंगभूमीवरील उत्कृष्ट कलाकृती, दिग्दर्शक, लेखक आणि कलाकारांचा सन्मान या सोहळ्यात करण्यात आला. यंदाची थीम होती मराठी नाटकांचा दौरा! या दौऱ्यात होणाऱ्या गमती-जमती, किस्से यांची सुंदर सांगड या सोहळ्यात अनुभवायला मिळाली. यावर्षी ‘नाट्यगौरव जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ लेखिका व दिग्दर्शिका सई परांजपे यांना प्रदान करण्यात आला.

संकर्षण कऱ्हाडेने त्याच्या खास शैलीत संपूर्ण सोहळ्याचं सूत्रसंचालन करत उपस्थितांची मनं जिंकून घेतली. रंगभूमीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकासाठी हा एक अविस्मरणीय अनुभव ठरला. कारण, दमदार आणि मनोरंजक नाट्यप्रवेश यावेळी सादर करण्यात आले. यावर्षी ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ हा पुरस्कार सचिन खेडेकर यांना प्रदान करण्यात आला. तर, यावर्षीची ‘सर्वोत्कृष्ट जोडी ठरली’ आहे संकर्षण कऱ्हाडे आणि तन्वी मुंडले. विजेत्यांची संपूर्ण यादी खालीलप्रमाणे आहे…

व्यावसायिक नाटक विभाग

  1. सर्वोत्कृष्ट व्यावसायिक नाटक – करुणाष्टके
  2. सर्वोत्कृष्ट अभिनेता : सचिन खेडेकर – भूमिका
  3. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : पर्ण पेठे – करुणाष्टके
  4. विशेष लक्षवेधी कलाकृती – द किरण माने शो, स्टोरी शिवराज्याभिषेकाची
  5. विशेष लक्षवेधी तरुणाईचं नाटक – ठरलंय Forever
  6. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन : प्राजक्त देशमुख – करुणाष्टके
  7. सर्वोत्कृष्ट लेखन : हृषिकेश जोशी – बोलविता धनी
  8. विशेष योगदान पुरस्कार – श्री. वामन पंडित
  9. चमकदार कलाकृती विशेष पुरस्कार – भूमिका नाटक
  10. सर्वोत्कृष्ट अनुरुप जोडी : संकर्षण कऱ्हाडे व तन्वी मुंडले – कुटुंब किर्रतन
  11. Most Trusted Face of The Year – गीतांजली कुलकर्णी
  12. जीवनगौरव पुरस्कार २०२६ – सई परांजपे
  13. सर्वोत्कृष्ट विनोदी नाटक – कुटुंब किर्रतन
  14. सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता : संकर्षण कऱ्हाडे – कुटुंब किर्रतन
  15. सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री : विशाखा सुभेदार – द दमयंती दामले
  16. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : संग्राम समेळ – गोष्ट तिच्या घटस्फोटाची
  17. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : समिधा गुरु – भूमिका
  18. सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत : निनाद-सिद्धांत – बेबल्याचो घोव
  19. सर्वोत्कृष्ट संगीत : साई-पियुष – का रुसली रखुमाई?
  20. सर्वोत्कृष्ट नेपथ्य : सचिन गांवकर – करुणाष्टके
  21. सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना : शीतल तळपदे – शश$$.. घाबरायचं नाही
  22. सर्वोत्कृष्ट वेशभूषा : मंगल केंकरे – शश$$.. घाबरायचं नाही
  23. सर्वोत्कृष्ट रंगभूषा : राजेश परब – बोलविता धनी

प्रायोगिक नाटक विभाग

  1. सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाटक – बरड
  2. सर्वोत्कृष्ट अभिनेता : महेश गावडे – बरड
  3. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : नीलम वाडेकर – बरड
  4. सर्वोत्कृष्ट लक्षवेधी प्रायोगिक नाटक – एक तिची गोष्ट
  5. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन : सचिन शिंदे – इथेच टाका तंबू
  6. सर्वोत्कृष्ट लेखन : सुनील डोंगर – बरड
  7. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : प्रमोद यादव – बरड आणि उमेश जगताप – इथेच टाका तंबू
  8. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : शर्वरी लहाडे – मग तू मला खा आणि कोमल पाटील – बरड
  9. सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत : सारंग कुलकर्णी – महापूर
  10. सर्वोत्कृष्ट संगीत : सौरभ भालेराव – मग तू मला खा!
  11. सर्वोत्कृष्ट वेशभूषा : आशिष देशपांडे – मग तू मला खा!
  12. सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना : प्रणव सपकाळे, निखिल मारणे – इथेच टाका तंबू
  13. सर्वोत्कृष्ट नेपथ्य : विक्रम ननावरे आणि प्रसाद चिने पाटील – इथेच टाका तंबू

दरम्यान, या सगळ्या विजेत्या कलाकारांवर संपूर्ण मनोरंजन विश्वातून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.

Award Banner