scorecardresearch

“कंगनाला पद्मश्री मग आम्हाला…” प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्रीने भारत सरकारवर केली टीका

अमिताभ बच्चन यांच्या ‘सूर्यवंशम’ चित्रपटात त्यांनी काम केले आहे

“कंगनाला पद्मश्री मग आम्हाला…” प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्रीने भारत सरकारवर केली टीका
फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असते. कधी बॉलिवूडवर निशाणा साधल्यामुळे तर कधी राजकीय घडामोडींवर भाष्य केल्यामुळे कंगना स्वतःकडे लक्ष वेधून घेत असते. एका दाक्षिणात्य अभिनेत्रीने तिच्याबाबत एक मोठे विधान केल्याने साहजिकच कंगना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

तेलगू सुपरस्टार नंदामुरी बालकृष्ण यांच्या ‘अनस्टॉपेबल विथ एनबीके’ नावाच्या शोमध्ये अभिनेत्री जयसुधा, जया प्रदा आणि राशी खन्ना पाहुण्या होत्या. या शोमध्ये त्यांनी दक्षिण भारतीय सिनेमाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल भारत सरकारवर टीका केली. त्या असं म्हणाल्या, “कंगना रणौतला पद्मश्री मिळाला. ती एक अप्रतिम अभिनेत्री आहे. केवळ १० चित्रपटांमध्ये काम करून हा पुरस्कार मिळाला आहे.. इथे आम्ही अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र सरकारने आमची दखलही घेतलेली नाही.”

“प्रेम सर्वात….” तुनिषा शर्माच्या ‘त्या’ टॅटूची सोशल मीडियावर चर्चा

जयसुधा या एक प्रसिद्ध अभिनेत्री असून त्यांनी अनेक तेलगू चित्रपटात काम केले आहे. १९७२ साली त्यांनी ‘पंदन्ति कापूरम’ या तेलगू चित्रपटातून आपल्या कारकिर्दीला सुरवात केली. अमिताभ बच्चन यांच्या ‘सूर्यवंशम’ चित्रपटात त्यांनी काम केले आहे.

कंगना सध्या तिच्या ‘इमर्जन्सी चित्रपटावर काम करत आहे. या चित्रपटात ती पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तिने स्वत: या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ‘इमर्जन्सी’ चित्रपटात अभिनेता श्रेयस तळपदे, मिलिंद सोमण, अनुपम खेर यांसह अभिनेत्री महिमा चौधरी महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहे. येत्या २०२३ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-12-2022 at 16:55 IST

संबंधित बातम्या